कोणत्याही नंबरवरून हा फोन येतो. समोरून एका महिलेचा आवाज येतो. तुम्ही कोरोना लस घेतली आहे की नाही? असं विचारलं जातं. यानंतर कोरोना लस घेतली असेल तर हो म्हणून एक दाबा आणि नाही म्हणून दोन दाबा असं सांगितलं जातं. फिडबॅकसाठी तुम्ही यातील कोणतंही बटण दाबाल तर अडचणीत सापडाल.
काय अडचण निर्माण होईल?
advertisement
दिल्ली पोलिसांशी संबंधित सायबर एक्सपर्ट किस्ले चौधरी यांनी याबाबत अलर्ट केलं आहे. सायबर फ्रॉडची ही नवीन टेक्निक असल्याचं त्यांनी सांगितलं. किस्ले म्हणाले, तुम्ही एक किंवा दोन बटणे दाबताच तुमचा फोन हँग होईल. तुम्हाला काही समजेल तोपर्यंत तुमचा फोन सायबर हॅकर्सच्या हाती गेला असेल आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे निघून जातील.
दिवसभर फक्त चॅटिंग करून कमवले 30 कोटी; कमाईची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
कोरोना लसीच्या नावाखाली फसवणुकीची अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे पोलीसही लोकांना याबाबत सतर्क करत असून विनाकारण कोणत्याही कॉलला उत्तर देण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे.
सायबर फ्रॉडची नवी टेक्निक
किस्ले म्हणतात की, सायबर गुन्हेगार इतके हुशार असतात की त्यांना एखाद्या व्यक्तीला कसे अडकवायचे हे माहित असतं. ते अशा गोष्टी घेऊन येत आहेत की एखाद्या व्यक्तीला हे देखील कळणार नाही की ही देखील फसवणूकीची पद्धत असू शकते. त्यामुळे अत्यंत सतर्क राहा. कोणतेही जंक कॉल उचलू नका. उठवल्यास कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका.
सायबर फ्रॉड होऊ नये काय काळजी घ्यावी?
कोणालाही ब्रँडेड गॅजेट्सची, कॅशबॅक, क्रेडिट कार्डची लालूच दाखवून किंवा खोट्या ऑफर्सना (Fake Offers) बळी पाडून त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जाते. अशा प्रकारचे फिशिंग ई-मेल्स, मेसेजेस, कॉल्सला उत्तर न देणं गरजेचं आहे.
अनोळखी मेसेज, लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही व्यवहारादरम्यान आलेला ओटीपी इतर कोणालाही पाठवू नये. एटीएम कार्डचा पिन, कार्डचा नंबर किंवा सीव्हीव्ही नंबर कोणालाही देऊ नये. आपला पत्ता, जन्मतारीख किंवा कोणतीही वैयक्तिक शेअर करू नये.
काही वेळा कस्टमर केअर सेंटरमधून (Fake Customer Care Center) बोलत असल्याचं सांगूनही फसवणूक केली जाते. तसंच, कस्टमर केअर सेंटरचा नंबर म्हणून इंटरनेटवर काही सायबर गुन्हेगारांनी स्वतःचे नंबर्सही सेव्ह केलेले असतात. कोणत्याही उत्पादनाच्या किंवा सेवेच्या कस्टमर केअर सेंटरचा नंबर तुम्ही ते उत्पादन किंवा सेवा जिथून घेताय, त्यांच्या कागदपत्रांवरूनच किंवा अधिकृत वेबसाइटवरूनच घेऊन लावावा.
WhatsApp Fraud Call: तुमच्या WhatsApp वर 'या' नंबरवरून कॉल आला तर सावध व्हा; धोक्याचा इशारा जारी
कोणताही कस्टमर केअर अधिकारी ग्राहकाची वैयक्तिक माहिती मागत नाही. त्यामुळे अशी माहिती देऊ नये. त्यामुळे फोनवर कोणीही बँकिंग संबंधित किंवा इतर खासगी माहिती मागितल्यास, सावध व्हा.
अलीकडे फेसबुक किंवा अन्य वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर बनावट प्रोफाइल्स बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे. एखाद्याच्या नावाने प्रोफाइल बनवून त्याच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यानंतर मेसेज पाठवून इमर्जन्सीसाठी पैसे मागितले जातात. हे टाळण्यासाठी सोशल मीडियावर सावधानता बाळगायला हवी. फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आल्या स्वीकारू नये. तो खरंच आपला मित्र आहे का हे तपासावं. म्युच्युअल फ्रेंड्स कोण आहेत ते पाहावं. पैसे मागितले जात असतील तर आपल्या मित्राला फोन करून प्रत्यक्ष विचारावं आणि खात्री करावी.