या तलावात एकही बेडूक नाही, असं का?
केरळ राज्याच्या तिरुवनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यांच्या सीमेवरील ओयूर या गावात एक असा तलाव आहे, जिथे बेडूक अजिबात आढळत नाहीत. या ऐतिहासिक तलावाला 'माक्रीइल्लाकुलम' म्हणजेच 'बेडूक नसलेले तळे' म्हणून ओळखले जाते. हे तळे मारुथमोनपल्ली येथे वसलेले आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे की, इथे बेडूक राहत नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. समाजसुधारक पी. कृष्णा पिल्लई यांनी त्यांच्या 'माक्रीइल्लाकुलम' नावाच्या कादंबरीत या तलावाशी संबंधित दंतकथा आणि ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
...तर अशी आहे दंतकथा
फार पूर्वी या तलावाजवळ 'अकावूर माना' नावाचा एक मठ होता. या मठातील साधू दररोज तलावाच्या काठावर सूर्य नमस्कार आणि ध्यानधारणा करत असत. मात्र, बेडकांच्या सततच्या डराव डराव करण्यामुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येत होता. बेडकांच्या या त्रासाला कंटाळून अखेर साधूंनी तलावातील बेडकांना शाप दिला की, ते सर्व नष्ट होतील. हीच दंतकथा या बेडूक नसलेल्या तलावाविषयी सांगितली जाते. या दंतकथेमागील सत्य शोधण्याचा कोणी फारसा प्रयत्न केला नसला तरी, स्थानिक लोक आजही सांगतात की, या तळ्यात बेडूक नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. हे एक न उलगडलेलं कोडं आजही कायम आहे.
हे ही वाचा : ना आवाज, ना वेदना, ना कोणती खूण... 'हा' साप चावला की, 90 मिनिटांत होतो मृत्यू, पावसाळ्यात घ्या विशेष काळजी!
हे ही वाचा : ना चालवणार, ना विकणार... 30 वर्षांपासून एकाच जागी उभा आहे 'हा' ट्रॅक्टर; या कुटुंबांची आहे अनोखी जिद्द!