बऱ्याच जणांना फास्ट फूड आणि जंक फूड सारखंच वाटतं. पण तुम्हाला माहितीय का की हे दोन्ही ही वेगवेगळे आहेत? चला जाणून घेऊ फास्ट फूड आणि जंक फूडमधील फरक
जंक फूड म्हणजे काय?
जंग फूड हे नेहमी पॅकेट रॅपमध्ये येतात. ज्याला बनवण्यासाठी कोणतीही झंझट नसते. म्हणजेच ते रेडी टू इट असतात. यामध्ये चिप्स, बिस्किट्स, पॅक सॅन्डविच, कुरकुरे सारख्या गोष्टींचा समावेश आहे.
advertisement
फास्ट फूड म्हणजे काय?
फास्ट फूड ते आहे जे तुम्ही बाहेरुन ऑर्डर करुन मागवता. ज्याला घरी देखील बनवलं किंवा गरम केलं जाऊ शकतं. यामध्ये रेडी टू कूक जसे पिझ्झा, चाऊमीन, फ्राईज सारख्या गोष्टींचा समावेश आहे.
जंक फूड असोत किंवा फास्ट फूड दोन्हीही एका वेळेनंतर जास्त प्रमाणात खाल्याने शरीरासाठी नुकसानदायक ठरतात.
फास्ट फूड हे जंक फूडपेक्षा थोडे चांगले असतात. कारण फास्ट फूडमध्ये तुम्ही भाज्या आणि सलाड टाकून त्याला थोड्या प्रामानात हेल्दी बनवू शकता. जे खाल्याने तुमच्या शरीराला चांगले घटक देखील मिळतात. परंतू असं असलं तरी तुम्ही आरोग्यदायी शरीरासाठी दोन्ही गोष्टी न खालेल्या बऱ्या.
