पूराच्या पाण्यात कुत्रा वाहून गेला. स्वतःला वाचवण्यासाठी तो किती मेहनत घेत आहे हे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या धाडसी कुत्र्याचा व्हिडीओ पाहून सर्वच त्याचं कौतुक करत आहे.
VIDEO: रेल्वे ट्रॅक ओलांडताना पिता-पुत्रांना बसली जबर धडक, हवेत उडत प्लॅटफॉर्मवर पडले
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पूराच्या पाण्यात कुत्रा अडकला आहे. नाल्यातील पाणी वेगाने वाहत असून कुत्रा स्वतःला वाचवण्यासाठी पोहत आहे. वाहत्या पाण्याचा जोर जास्त असल्यानं कुत्रा पाण्यात पूर्ण बुडत आहे. शेवटी तो कसाबसा पाण्याच्या ओघातून बाहेर पडत एक साईडला जातो. तो तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो मात्र कठडा उंच असल्यानं त्याला बाहेर पडता येत नव्हतं. तेवढ्याच एक व्यक्ती येतो आणि कुत्र्याला बाहेर काढतो. तो कुत्र्याची कॉलर पकडून सुरक्षित ठिकाणी त्याला वर घेतो.
advertisement
@DaleRTyMG नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 59 सेकंदचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहे.
दरम्यान, प्राणी, माणूस, घरं, गावं, मंदिरं पावसाच्या पाण्याखाली गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत तर कुठे सतत पाऊस कोसळत आहे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
