ट्रम्प हे व्यक्तिमत्व फक्त अमेरिकेतच नाही तर जगभर चर्चेत असतं. त्यांचं राजकारण, उद्योग व्यवसाय अशा अनेक गोष्टींमुळे ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या काही चित्रविचित्र गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या गोष्टी तुम्हाला माहिती असण्याची फारशी शक्यता नाही. ट्रम्प यांचं वैवाहिक आयुष्य, लग्न, कुटुंब आणि प्रचंड मालमत्ता अशा अनेक गोष्टींमुळे ते कायम बातम्यांचा विषय असतात. मात्र, त्यांच्यासारख्या गर्भश्रीमंत व्यक्तीलाही एक मानसिक आजार आहे. त्यांनी त्यावर कधीही उपचार मात्र घेतलेले नाहीत.
advertisement
1993 मध्ये ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवत होते तेव्हाची त्यांची एक मुलाखत खूप गाजली होती. ‘द होवर्ड स्टर्न शो’ या कार्यक्रमात होस्ट स्टर्नने ट्रम्प यांना त्यांच्या ‘ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर’ या आजाराबाबत विचारलं होतं. ट्रम्प यांनी ही गोष्ट खरी असल्याचं सांगत आपल्याला सतत हात धुण्याचा नाद असल्याचं सांगितलं होतं. दिवसातून कितीही वेळा ते हात धुवू शकतात. त्यांना ग्लास हाताने उचलून तोंडाला लावून पाणी पिणं आवडत नाही. ते त्यासाठी स्ट्रॉ वापरतात. लोकांशी शेकहॅंड करणं त्यांना आवडत नाही पण तसं करावं लागलंच तर त्यानंतर कधी एकदा हात धुतो असं त्यांना होतं. साफसफाई आणि टापटिपीबद्दल ते कमालीचे आग्रही आहेत. हा मानसिक आजार असू शकतो; पण ते त्यासाठी कधी डॉक्टरांकडे गेले नाहीत असं ते सांगतात.
General Knowledge : मुलीला विचारलं तिचं नाव, तिनं सांगितलं WV733N; आता सांगा याचा अर्थ काय?
ट्रम्प यांचं वैयक्तिक आयुष्य आणि ग्लॅमर जगताशी त्यांचा असलेला संबंध हे सर्वज्ञात आहे. असं असूनही ट्रम्प यांनी कधीही दारुच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही हे बहुधा कुणाला खरं वाटणार नाही. पण यामागचं कारण ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू दाखवणारं आहे. ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प याचा वयाच्या अवघ्या 43 व्या वर्षी मृत्यू झाला. तो प्रचंड प्रमाणात मद्यपान करत असे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं. फ्रेडच्या मृत्यूची घटना ट्रम्प यांच्या मनावर आघात करुन गेली. त्यामुळेच त्यांनी दारुच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. लहानपणी ते अत्यंत खोडकर होते, त्यामुळे वयाच्या 12 व्या वर्षीच वडिलांनी त्यांना सैनिकी स्कूलमध्ये पाठवलं होतं.
