उत्तराखंडमधील नैनितालमधून हे विचित्र प्रकरण समोर आले आहे. नैनिताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकमधील एका सरकारी हायस्कूलने उत्तराखंड बोर्डाच्या दहावीच्या निकालात एक विचित्र विक्रम केला आहे. या रेकॉर्डमुळे ही शाळा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेत दहावीत फक्त एकच विद्यार्थी होता, तोसुद्धा उत्तराखंड बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत नापास झाला.
Maharashtra HSC 12th Result 2025 : यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, परीक्षेत मुलीच कशा काय अव्वल येतात?
advertisement
नैनिताल जिल्हा मुख्यालयापासून 115 किमी अंतरावर असलेल्या भद्रकोट गावातील ही शाळा. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शाळेत इयत्ता सहावी आणि सातवीमध्ये प्रत्येकी दोन विद्यार्थी आहेत, तर इयत्ता आठवी, नववी आणि दहावीमध्ये प्रत्येकी एक विद्यार्थी आहे. संपूर्ण शाळेत 7 विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापक, एक लिपिक आणि एक स्वयंपाकी असे 7 शिक्षक आहेत. या शिक्षकांपैकी एकाला दुसऱ्या शाळेत व्यवस्था करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे. पण हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यासारख्या प्रमुख विषयांचे शिक्षक शाळेत उपस्थित आहेत.
19 एप्रिल रोजी उत्तराखंड शालेय शिक्षण मंडळाचे निकाल जाहीर झाले. तेव्हा या शाळेत असलेला दहावीचा एकमेव विद्यार्थीही फेल झाल्याचं समोर आलं. दहावीच्या या एकमेव विद्यार्थ्याने सर्व विषयांमध्ये कमी गुण मिळवले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विद्यार्थ्याला हिंदीमध्ये सुमारे 10 गुण मिळाले आहेत. इंग्रजी, विज्ञान, सामाजिक अभ्यास आणि गणितात 10 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत.
Vande Bharat : 'वंदे भारत'मध्ये मळके, फाटके कपडे घातलेला प्रवासी, आधार कार्ड पाहून टीटीही हैराण
माध्यमिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त संचालक जी.एस. सौन यांनी सांगितलं की, शाळेत पूर्ण कर्मचारी तैनात असूनही एकाही विद्यार्थ्याला बोर्डाची परीक्षा देता आली नाही हे खूप विचित्र आहे. मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांना शाळेला भेट देऊन खरं कारण शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना बोर्ड परीक्षेचे निकाल आणि शाळांची कामगिरी तपासताना या शाळेची आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.