TRENDING:

या VIDEO मध्ये आहेत 18 डान्सर, फक्त 5 सेकंदात शोधून दाखवा

Last Updated:

Eye Challenge : सुरुवातीला तुम्हाला फरशीवर 7, टेबलवर 2 आणि टिव्हीत 2 अशा 11 डान्सर्स सहज दिसतील. पण त्यानंतरच्या 7 डान्सर्स सहजासहजी दिसत नाहीत. त्या शोधणं म्हणजे आव्हान आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर तुम्ही असे व्हिडीओ पाहत असाल. ज्यात काही डान्सर नाचताना दाखवल्या जातात. त्यांचा आकडा सांगितलेला असतो आणि तितक्या डान्सर शोधून काढायच्या असतात. असाच हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एकूण 18 डान्सर असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या अठराही डान्सर्सना फक्त 5 सेकंदात शोधण्याचं चॅलेंज या व्हिडीओत देण्यात आलं आहे.
News18
News18
advertisement

एका घराचा हा व्हिडीओ ज्यात टीव्ही, त्यासमोर टेबल सजावट म्हणून टेबलवर आणि टीव्हीभोवती फुलं दिसत आहेत. अगदी साधा असा व्हिडीओ आहे. ज्यात फार गर्दी नाही आहे. घरात इतकंच सामान दिसतं आहे आणि इतक्याच भागात तुम्हाला 18 डान्सर शोधायच्या आहेत. यात आपल्याला लगेच डान्सर सापडतील असा विश्वास तुम्हाला असेल पण दिसतं किंवा वाटतं तितकं हे चॅलेंज सोपं नाही आहे.

advertisement

सुरुवातीला तुम्हाला फरशीवर 7, टेबलवर 2 आणि टिव्हीत 2 अशा 11 डान्सर्स सहज दिसतील. पण त्यानंतरच्या 7 डान्सर्स सहजासहजी दिसत नाहीत. त्या शोधणं म्हणजे आव्हान आहे. आता तुम्ही त्यांना शोधा आणि त्या कुठे आहेत त्याचा स्क्रिनशॉट काढून आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा.

ऐकाल तर ऐकतंच राहाल! आजीआजोबांनी गायलं मुकेश आणि लता मंगेशकर यांचं हिट गाणं, होतंय तुफान VIRAL

advertisement

आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. त्यावरून त्या डान्सर्स सापडत आहेत का पाहा. टीव्ही, टेबल आणि फरशीवर डान्स करणाऱ्या डान्सर्सच्या अवतीभोवती त्या इतर 7 डान्सर्स आहेत. तुम्हाला जर त्या डान्सर्स सापडल्या असतील तर ठिक आहे. नाहीतर आता आम्ही तुम्हाला त्या डान्सर्स शोधून दाखवतो.

@princess_samara21 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सगळ्यात आधी टिव्ही आणि त्याच्या आसपास पाहा. व्हिडीओत जिथं आय चॅलेंज असं लिहिण्यात आलं आहे, त्याच्या अगदी खाली एक डान्सर आहे.

advertisement

त्यानंतर टीव्हीकडे पाहा. टीव्हीच्या आत जो तरुण दिसतो आहे, त्याच्या उजव्या बाजूला पाहा. तिथं एक आणि टिव्हीवर जिथं This लिहिलं आहे तिथं आणि टिव्हीच्या अगदी वर काळी बॉर्डर आहे तिथं अशा एकूण 3 डान्सर्स इथं झाल्या.

आता स्पष्टपणे दिसणाऱ्या डान्सर्स पाहा. त्या जेव्हा त्यांचे दोन्ही पाय लांब नेतात तेव्हा त्यांच्या पायांच्या मध्ये पाहा. दोन्ही कडेला असलेल्या डान्सर्सच्या पायाच्या मध्येच तुम्हाला प्रत्येकी एक डान्सर दिसेल.

आता उरली शेवटची अठरावी डान्सर तर यासाठी टेबलकडे पाहा. टेबलचा पुढचा डावा पाय तिथं ही डान्सर तुम्हाला दिसेल.

Hotel Facts : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर फ्री का देतात? आहे खास कारण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

आता आधी सहज दिसलेल्या आणि आता शोधलेल्या अशा डान्सर्स मोजा. एकूण 18 डान्सर्स झाल्या की नाही? तुम्ही या सगळ्या डान्सर्सना शोधलं होतं का? आणि किती वेळात ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसंच आता ही बातमी इतरांना शेअर करून त्यांनासुद्धा डान्सर्स शोधण्याचं चॅलेंज द्या.

मराठी बातम्या/Viral/
या VIDEO मध्ये आहेत 18 डान्सर, फक्त 5 सेकंदात शोधून दाखवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल