Hotel Facts : हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर फ्री का देतात? आहे खास कारण
- Published by:Priya Lad
Last Updated:
हॉटेल मोठं असो वा छोटं तिथं एक गोष्ट खूप सामान्य आहे आणि ती म्हणजे जेवणाच्या बिलासह मोफत दिली जाणारी बडीशेप-खडीसाखर. ही काही खास परंपरा आहे का की त्यामागे काही खास कारण आहे?
advertisement
हॉटेलमधील मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात जडपणा, गॅस किंवा अपचन जाणवू शकते. अशा परिस्थितीत बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक तेल अ‍ॅनेथॉल पाचक रस आणि एन्जाइम्सच्या स्रावाला उत्तेजन देतं. ज्यामुळे अन्नाचं जलद आणि चांगलं पचन होण्यास मदत होते. तर खडीसाखर पोट थंड ठेवते ज्यामुले आम्लपित्तची समस्या होत नाही.
advertisement
advertisement
advertisement


