अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ही घटना. एका अंत्यसंस्कारादरम्यान एक अपघात घडला ज्यामुळे लोकांना धक्का बसला. मृतदेह असलेल्या शवपेटीसह मृताचं कुटुंबही कबरीत सामावले. जेव्हा कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी शवपेटी कबरीकडे घेऊन जात होते, तेव्हा माती कोसळली आणि सर्व लोक शवपेटीसह कबरीत पडले.
बेडखाली राक्षस! सतत सांगायचा मुलगा पण केलं दुर्लक्ष, एकदा घडलं असं, नॅनीचा उडाला थरकाप
advertisement
कबरीत पडल्यामुळे लोकांना पाय, पाठ आणि हातांना गंभीर दुखापत झाली. अपघात इतका अचानक होता की कोणीही सावरू शकलं नाही. या अपघातात सर्वात जास्त नुकसान मृताचा मुलगा बेंजामिनला झालं. जो शवपेटीखाली गाडला गेला. तो खाली चिखलात अडकला आणि बेशुद्ध पडला.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कुटुंबातील इतर सदस्यांनी रेकॉर्ड केला होता, जो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता. तो व्हायरल झाला.
Premanand Maharaj : जेव्हा आश्रमाजवळ प्रेमानंद महाराजांचा झाला भूताशी सामना, सांगितला थरारक अनुभव
मृताच्या मृत्यूनंतर ही दुर्घटना कुटुंबासाठी आणखी एक धक्का ठरली. कुटुंबाने स्मशानभूमी प्रशासन आणि अंत्यसंस्कार सेवा देणाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि भरपाईची मागणी केली. मृताची सावत्र मुलगी मेरीबेले रॉड्रिग्ज म्हणाली की, तिचा भाऊ बेशुद्ध पडला होता आणि चिखलात गाडला गेला होता. स्वतः खूप घाबरली होती. तिनं या घटनेचं वर्णन भयानक असं केलं. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने जाहीरपणे माफी मागावी आणि या निष्काळजीपणाबद्दल योग्य भरपाई द्यावी अशी कुटुंबाची मागणी आहे.