advertisement

Premanand Maharaj : जेव्हा आश्रमाजवळ प्रेमानंद महाराजांचा झाला भूताशी सामना, सांगितला थरारक अनुभव

Last Updated:

Premanand maharaj : संत प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला एक भयानक प्रसंग सांगितला. एकदा रात्री त्यांना एका भूताचा सामना करावा लागला. प्रेमानंद महाराजांच्या जीवनाशी संबंधित या भयानक घटनेबद्दल जाणून घेऊया.

News18
News18
नवी दिल्ली :  वृंदावनातील संत प्रेमानंद जी महाराज हे राधाराणीचे परम भक्त आहेत. त्यांच्या ज्ञान आणि अनुभवांच्या बळावर ते लोकांच्या समस्या सोडवण्याचं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. एकदा त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक भयानक गोष्ट सांगितली, जी जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एकदा रात्री त्यांना एका भूताशी सामना करावा लागला.
भूताशी संबंधित त्या घटनेची आठवण करून देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, एकदा जंगलाच्या काठावर एक आश्रमही होतं. तिथं जवळ एक ठिकाण होतं, आश्रमातील लोक तिथं भूत आहेत असं सांगत होते. पण प्रेमानंद महाराज त्याचठिकाणी झोपायला गेला. रात्री 9 वाजता ते तिथे गेले, झोपले असता त्यांना जाणवलं की कोणीतरी खूप जड मांड्या असलेला त्याच्यावर चढला आहे.
advertisement
प्रेमानंद महाराज म्हणाले, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते पूर्णपणे शुद्धीवर होते, झोपलेले नव्हते. जेव्हा त्यांनी त्यांचा हात मागे सरकवला तेव्हा त्याने त्यांच्या जटा पकडल्या. पण ते त्यांच्या मनात एक मंत्र जपत होते. मग ते अचानक तो त्यांच्या जागेवरून उठले. त्यांना वाटलं की हा मनाचा भ्रम आहे. आपण नामजप करत आहोत आणि हे असं घडणं शक्य नाही, असं त्यांना वाटलं.
advertisement
मग ते तिथून बाहेर आला, काही वेळ तिथेच उभे राहिले, मग विचार केला की भूत अस्तित्वात नाहीत. मग ते पुन्हा तिथं गेले आणि चटईवर झोपले. तेव्हा भूत त्यांच्या छातीवर चढला. वजन जास्त असल्याने त्यांचा श्वास थांबला. प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की त्यावेळी त्यांच्या मनात शिवमंत्राचा जप सुरू होता. त्यांनी मंत्र जपाचा वेग वाढवला. त्या मंत्राच्या जपाच्या परिणामामुळे भूत प्रेमानंद महाराजांना सोडून गेले. तो त्यांच्या शरीरापासून वेगळा झाला.
advertisement
प्रेमानंदजींनी म्हणाले, भूत नकारात्मक शक्ती आहे, जर मंत्र जप चालू असेल तर ते कोणालाही हानी पोहोचवू शकत नाहीत. पवित्र भूत देखील अस्तित्वात असतात, असंही त्यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Premanand Maharaj : जेव्हा आश्रमाजवळ प्रेमानंद महाराजांचा झाला भूताशी सामना, सांगितला थरारक अनुभव
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement