Earthquake : लघवी केली म्हणून भूकंपातूनही वाचला, ढिगाऱ्याखाली दबलेली व्यक्ती 5 दिवसांनी जिवंत

Last Updated:

Myanmar earthquake man survived : म्यानमार भूकंपाच्या पाच दिवसांनी ढिगाऱ्याखाली जिवंत सापडलेल्या व्यक्तीची थरकाप उडवणारी कहाणी.

News18
News18
बँकॉक : म्यानमारमधील भूकंपात कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे. पण याचवेळी एक चमत्कारही घडला आहे. एका हॉटेलच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेली एक व्यक्ती तब्बल 5 दिवसांनंतर दिवंत सापडली आहे. ही घटना कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याच्या बचावाची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. या व्यक्तीने आपण लघवी पिऊन जिवंत राहिल्याचं सांगितलं.
टिन माँग हटवे असं या व्यक्तीचं नाव. ते एक शिक्षक आहे. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक. म्यानमारमध्ये भूकंप झाले तेव्हा ते भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या सागिंगमध्ये होते. एका हॉटेलच्या इमारतीत. भूकंपामुळे इमारत कोसळली आणि बरेच लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गेले. इथं बचाव करणाऱ्यांनी कुणीही जिवंत सापडेल याची आशाच सोडली होती. तेव्हाच या इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेले टिन माँग ह्टवे जिवंत सापडले.
advertisement
भूकंपावेळी त्यांना दोन गोष्टींनी मदत केली, एक म्हणजे शालेय शिक्षण आणि दुसरं म्हणजे स्वतःची लघवी.
भूकंपावेळी टिन माँग ह्टवे यांना शाळेतील धडा आठवला ज्यामध्ये भूकंप झाल्यास बेड किंवा टेबलाखाली जावं, असं सांगितलं होतं. भूकंप झाला तसं ते लगेच बेडखाली गेले. त्यानंतर संपूर्ण हॉटेल कोसळलं आणि त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला.
advertisement
5 दिवस ते बेडखाली जिवंत राहण्यासाठी धडपड करत होते. त्यांनी सांगितलं, मी फक्त 'मला वाचवा, मला वाचवा' असं ओरडत होतो. मी जणू नरकात आहे असं वाटत होतं. माझ्या शरीराचं तापमान वाढलं होतं. मला पाण्याची गरज होती, पण तिथं पाणी नव्हते. त्यामुळे मला माझा घाम आणि लघवी प्यावी लागली.
advertisement
म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी 28 मार्च 2025 रोजी 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला.भूकंपातील मृतांचा आकडा तीन हजारांच्या जवळ पोहोचला आहे, तर 4 हजार लोक जखमी झालेत. शेकडो लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Earthquake : लघवी केली म्हणून भूकंपातूनही वाचला, ढिगाऱ्याखाली दबलेली व्यक्ती 5 दिवसांनी जिवंत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement