रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज, सकाळी दृश्य पाहूनच सगळ्यांचा उडाला थरकाप
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shocking news : मेक्सिको सिटीच्या आग्नेय भागात असलेल्या इक्षुआटलान डेल सुरेस्टेमधील हे प्रकरण. ज्या अंतर्गत एल टुनेल नावाचा ग्रामीण भाग येतो. या भागातील जंगलातून रात्रभर किंचाळण्याचा आवाज येत होता.
नवी दिल्ली : रात्री अचानक विचित्र आवाज आला तर साहजिकच भीती वाटते. हा आवाज कसला, कुणाचा असे कित्येक प्रश्न मनात निर्माण होतात. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. जिथं एका ठिकाणी रात्रभर किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तिथं गेले. तिथं जे दृश्य दिसलं ते पाहून सगळे घाबरले. सगळ्यांचा थरकाप उडाला.
मेक्सिको सिटीच्या आग्नेय भागात असलेल्या इक्षुआटलान डेल सुरेस्टेमधील हे प्रकरण. ज्या अंतर्गत एल टुनेल नावाचा ग्रामीण भाग येतो. या भागातील जंगलातून रात्रभर किंचाळण्याचा आवाज येत होता. सकाळी गेले असता त्यांना तिथे एका हाडांचा सांगाडा दिसला. जो अर्धा मानव आणि अर्धा प्राणी असा होता. त्या प्राण्याचा हात माणसासारखा होता आणि त्याची नखं प्राण्यांच्या नखांसारखी दिसत होती. त्या प्राण्याचा आकार लहान मेंढ्यासारखा होता आणि त्याच्या शरीरावरील फर देखील दिसत होते.
advertisement
लोकांनी या प्राण्याचं वर्णन वेअरवुल्फ आणि चुपाकब्रा असं केलं, जे पौराणिक प्राणी आहेत आणि रक्त शोषणाऱ्या व्हॅम्पायरसारखे मानले जातात. त्याचे हात माणसासारखे कसे असू शकतात हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले.
मिररच्या मते, जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा लोकांनी प्राण्याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले. पण काही लोकांनी त्याला वेअरवुल्फ म्हणून स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. लोक म्हणतात की ते अस्वलासारखं दिसतं. एकाने म्हटलं की ते उंदरासारखे दिसणाऱ्या ओपोसमसारखे प्राणी होते.
advertisement
तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की जेव्हा प्राण्याचे शरीर पूर्णपणे कुजले होतं फक्त हाडं होती मग लोकांनी आदल्या रात्री ओरडण्याचा आवाज येत असल्याचा दावा कसा केला? .
Location :
Delhi
First Published :
April 04, 2025 3:57 PM IST