भारतातील गावाची अनोखी जादू; जगभरातील पर्यटक पोहोचतात पहाटे 4 वाजता, कारण वाचून थक्क व्हाल!

Last Updated:

अरुणाचल प्रदेशातील डोंग गाव हे भारतातील सर्वात आधी सूर्योदय होणारे ठिकाण आहे. येथे पहाटे 4 वाजता सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक येतात. ट्रेकिंग आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सूर्योदय सर्वात आधी होतो हे सर्वश्रुत आहे. ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये सर्वप्रथम सूर्याची किरणे पडतात. मात्र यातील अरुणाचल प्रदेशातील ‘डोंग’ हे गाव असे ठिकाण आहे, जिथे भारतात सर्वात आधी सूर्योदय होतो. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव सुमारे 4,070 फूट उंचीवर वसलेले आहे. येथे पहाटे 4 वाजता सूर्योदय होतो. ही अनुपम निसर्गरम्यता अनुभवण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातील पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.
डोंग गावातील सूर्योदय
डोंग हे अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्याचे पूर्वेकडील गाव आहे. जे समुद्रसपाटीपासून 1,240 मीटर (सुमारे 4,070 फूट) उंचीवर आहे. या गावाची ओळख त्याच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी आहे. प्रवासाची आवड असलेल्यांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते. भारत, म्यानमार आणि चीन या तीन देशांच्या सीमावर्ती भागात हे गाव वसलेले आहे. येथे पोहोचण्यासाठी ट्रेकिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात एका अनोख्या ठिकाणी प्रवास करायचा असेल, तर डोंग गाव तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
advertisement
Image
डोंग कसे पोहोचाल?
डोंग गाव गाठण्यासाठी सर्वात सोपी मार्गिका डिब्रूगड विमानतळावर पोहोचणे आहे. तुम्ही दिल्ली, कोलकाता किंवा गुवाहाटी येथून अरुणाचलसाठी विमानसेवा घेऊ शकता. डोंगपर्यंत पोहोचण्यासाठी प्रथम ‘वालॉन्ग’ येथे पोहोचणे आवश्यक आहे. वालॉन्ग ट्रेकिंगचा मुख्य पॉइंट मानला जातो. येथून डोंग घाटी गाठण्यासाठी सुमारे 90 मिनिटे लागतात. सूर्योदयाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी पहाटे 2 वाजता ट्रेकिंग सुरू करावे लागते. हा ट्रेक थोडा आव्हानात्मक असला तरी सभोवताली पसरलेले हिरवेगार गवताळ कुरणे आणि डोंगररांगा संपूर्ण प्रवास थकवा विसरायला लावतात.
advertisement
पर्यटकांना परवानगी आवश्यक आहे का?
अरुणाचल प्रदेश हा संरक्षित क्षेत्र आहे. त्यामुळे या राज्याला भेट देण्यासाठी ‘इनर लाइन परमिट’ (ILP) आवश्यक असते. पर्यटक अरुणाचल प्रदेशाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन परमिटसाठी अर्ज करू शकतात. एकदा परवानगी मिळाल्यानंतर, अरुणाचलमधील डोंगसह अन्य सुंदर स्थळांना भेट देता येते.
Image
डोंगमध्ये निवास सुविधा
डोंगच्या सफरीसाठी आपण पायी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तेजू, ह्युलियांग किंवा हवाई या ठिकाणी निवासाची सोय उपलब्ध आहे. तसेच साहसप्रेमींना लोहित नदीच्या काठावर कॅम्पिंग करण्याचाही अनुभव घेता येतो. स्थानिक लोकही पर्यटकांसाठी छोट्या गेस्टहाऊसेस आणि होमस्टेची व्यवस्था करतात.
advertisement
भारतातील अनोखे पर्यटनस्थळ
डोंग गाव हे निसर्गसौंदर्य, शांतता आणि अनोखा सूर्योदय यांसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या पहिल्या किरणांचा आनंद घ्यायचा असेल आणि वेगळ्या साहसी अनुभवाची आस असेल तर हे ठिकाण तुमच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये नक्कीच असायला हवे.
advertisement
अरुणाचल प्रदेशातील डोंग गाव हे भारतातील सर्वात आधी सूर्यकिरणांचा स्पर्श होणारे ठिकाण आहे. येथे पहाटे 4 वाजता होणारा सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. ट्रेकिंगच्या माध्यमातून येथे पोहोचण्याचा थरारक अनुभव आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गावातील सौंदर्य एक अनोखा अनुभव देतो. निसर्गप्रेमी आणि साहसिक प्रवाशांसाठी डोंग हा उत्तम पर्याय आहे.
मराठी बातम्या/Viral/
भारतातील गावाची अनोखी जादू; जगभरातील पर्यटक पोहोचतात पहाटे 4 वाजता, कारण वाचून थक्क व्हाल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement