फर्रुखाबाद, 15 नोव्हेंबर : पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि फळझाडं, फूलझाडं, भाजीपाला लागवडीतून शेतकरी बांधव आता चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत. विशेष म्हणजे फळं आणि भाज्यांचा वापर दररोज होत असल्याने त्यांना बाजारात रोजची मागणी असते. परिणामी शेतकऱ्यांची त्यातून चांगली कमाई होते.
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद भागातील शेतकरी बांधव पेरूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत. किसरौली भागातील रहिवासी असलेले शेतकरी अजय कुमार यांनी सांगितलं की, 2008 पासून त्यांनी पेरूचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी दोन बीघे जागेत पेरूचं उत्पादन घेतलं होतं. हळूहळू ते 10 बीघे जागेपर्यंत विस्तारलं. आज या उत्पादनातून ते अत्यंत चांगलं आयुष्य जगत आहेत.
advertisement
आला थंडीचा महिना, बाजारात मिळणारे हे फळ नक्की खा, फायद्यांची यादी खूप मोठी
2 एकरात पेरूच्या लागवडीतून त्यांची सध्याची कमाई आहे 1 लाख 20 हजार रुपये. हवामान चांगलं असेल, तर हा आकडा दीड लाखांपर्यंतदेखील जातो. त्यांना आता या उत्पादनाचा जवळपास 15 वर्षांचा अनुभव आहे.
मुतखडा ते हृदय रोगावर आहे रामबाण! 'ही' भाजी वजनही करते कमी
पूर्वी याठिकाणी बटाट्याची लागवड मोठ्याप्रमाणात केली जायची. मात्र त्यातून उत्पादनाचा खर्च मिळवणंही कठीण झालं होतं. कधी अति पाऊस, तर कधी कडाक्याच्या उन्हामुळे बटाट्याचं उत्पादन मिळायचं नाही. परंतु पेरूच्या उत्पादनातून शेतकरी बांधव आनंदात आहेत. या पिकाला कीडदेखील जास्तप्रमाणात लागत नाही.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g