यूट्यूबवर कोब्रा फार्मिंगचा व्हिडिओ पाहून तुम्हाला भीती वाटेल. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने आपल्या घरात चिकनने भरलेलं भांडं ठेवलं आहे. सुरुवातीला वाटतं की तो त्याच्या मित्रांना पार्टी देणार, मात्र दुसऱ्या क्षणी तो त्यात प्रोटीन पावडर मिसळताना दिसतो. मग तो माणूस एका खोलीत जातो, तिथे लहान बॉक्ससारखे डबे आहेत. बॉक्सला कडी लावलेली आहे, त्याने कडी उघड्यावर त्यातून एक गव्हाळ रंगाचा साप बाहेर येतो. सापाला घाबरून तो माणूस मागे होतो. नंतर एका प्लेटमध्ये चिकन टाकून सापापुढे ढकलतो. हा कोब्रा चिकन खाऊन बॉक्समध्ये परत जातो. व्हिडिओमध्ये एक साप खाण्याऐवजी त्या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत दिसतो, मात्र तो त्याच्यासमोर वारंवार खायला ठेवतो.
advertisement
यूट्यूबवर हा व्हिडिओ जेम हंटर्स नावाच्या चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. तीन लाख सबस्क्रायबर्स असलेल्या या चॅनलवर कोब्रा फार्मिंगचा हा व्हिडिओ 84 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय. व्हिडिओला 23 हजारांहून जास्त लाईक्स आहेत. लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. या सापांमध्ये जाणे खूप धोकादायक आहे, सावध राहा, असे एका युजरने लिहिले. साप कैदेत? आणि कोणत्या हेतूने, कोणत्या हेतूने त्यांना पिंजऱ्यात ठेवतात? त्यांना नैसर्गिक अधिवासाची गरज असते, ते स्वतः शिकार करतात, अशी कमेंट एका युजरने केली. तर, कोब्रा चावल्याने माणूस मरू शकतो, हे माहीत असून त्यांना पाळण्याचे कारण काय? असं एका युजरने विचारलं.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आवाज; बाजूला करून पाहताच सगळ्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं
कोब्रा किती धोकादायक, लोक त्यांना का पाळतात?
ब्लॅक माम्बा, इनलँड तायपन यांच्यासोबतच कोब्रा पृथ्वीवरील सर्वात विषारी आणि धोकादायक साप मानला जातो. तो एकदा चावल्यानंतर पीडिताच्या शरीरात 200 ते 500 मिलीग्राम विष सोडतो. एकदा चावताना तो सात मिलीलीटर विष सोडू शकता, असा दावा काही संशोधनांनी केलाय. त्याच्या विषाचा 10वा भाग देखील 20 लोकांना मारू शकतो. इतका धोकादायक असूनही लोक त्याची शेती कशी करतात? असा प्रश्न पडतो. तर या विषारी सापांच्या शेतीतून व्हिएतनामचे लोक करोडो रुपये कमावतात. ते या सापांचे विष विकतात, त्यापासून अँटी व्हेनम बनवले जाते. नंतर सापाला मारून त्याचे हृदय आणि रक्तही विकले जाते, त्यामुळे लैंगिक क्षमता वाढते असा दावा केला जातो. सर्वात शेवटी सापांचे तुकडे करून त्यांचे मांस विकले जाते. अशा रितीने एका सापापासून हे लोक इतक्या पद्धतीने करोडो रुपये कमावतात.