बापलेकाच्या मृत्यूची ही धक्कादायक घटना. इंग्लंडमधील हे प्रकरण. 61 वर्षांचा नॉर्मन व्हाइट ज्याचा मुलगा डेव्हिडचा वयाच्या 41 व्या वर्षी मृत्यू झाला. डेव्हिड बऱ्याच काळापासून ड्रग्जच्या व्यसनाशी झुंजत होता. डेव्हिडने त्याचं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबाच्या मते, त्याने बरे होण्याच्या दिशेने बरीच प्रगती केली होती. पण एके दिवशी डेव्हिड त्याच्या एका नातेवाईकाच्या सोफ्यावर मृतावस्थेत आढळला. यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला.
advertisement
बापरे! 425 वर्षांपूर्वीचं ते संकट पुन्हा येतंय? शास्त्रज्ञांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी
मिरर यूकेच्या वृत्तानुसार डेव्हिडचा मृतदेह कॉफिनमध्ये ठेवून चर्चमध्ये नेला जात होता. तेव्हा नॉर्मन खाली कोसळला. यानंतर आपत्कालीन सेवेला बोलावण्यात आलं. पण नॉर्मनला वाचवता आलं नाही. त्याला हार्ट अटॅक आला. नॉर्मनलाही मृत्यूने गाठलं. मुलावर अंत्यसंस्कार करण्याआधीच बापानेही जीव सोडला.
वडिलांवर अंत्यसंस्कारानंतर मुलाचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच राजस्थानात घडलेली ही घटना. कोटा शहरातील हरिओम नगर कच्ची बस्ती येथील 50 वर्षीय पुरीलाल बैरवा हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून तो लकव्याच्या त्रासाने पीडित होता. त्याने अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले तोच त्याच्या मृत्यूनंतर काही तासांतच कुटुंबाला अजून मोठा आघात बसला.
पुरीलालचा 25 वर्षीय मुलगा राजू बैरवा हा वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने कोसळला. वडिलांची चिता थंड होण्याआधीच दोन तासांत त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचाही मृत्यू झाला. काही तासांच्या आत वडील आणि मुलगा दोघांना गमावल्याने घरच्यांचा विश्वासच बसेना. मोहल्ल्यातील लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि वातावरण शोकमग्न झाले.
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भावाच्या लग्नासाठी नोकरीला मारली लाथ, म्हणाली, माझं चुकलं काय?
हा गरीब मजूर कुटुंब आर्थिकदृष्ट्या इतका कमकुवत होता की दोघांच्या अंत्य संस्कारासाठीही खर्च भागवणं शक्य झालं नाही. अशा वेळी परिसरातील लोक आणि ओळखीचे पुढे आले आणि चंदा जमवून अंतिम विधी पार पाडण्यात आला. आता या घरात फक्त आई, गुड्डी आणि 13 वर्षांचा धाकटा मुलगा अरविंद उरले आहेत. एकाच दिवशी पती आणि मुलगा गमावलेल्या आईचा आक्रोश थांबत नाही आणि अरविंद अजूनही या मोठ्या अपघातातून सावरू शकलेला नाही.