बोधगया येथील एका खाजगी हॉटेलमध्ये हा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिथं रसगुल्ला नसल्यावरून वधू आणि वर पक्षात भांडण झालं. लग्न रद्द करण्यात आलं. माहितीवरून लग्नाची सगळी व्यवस्था वरपक्षाने केली होती. वधूपक्षा तिथं वराच्या स्वागतासाठी आधी पोहोचला होता. लग्नाच्या काही विधी झाल्या. नंतर जेवण सुरू झालं. जेवणात रसगुल्ला नाही यावरून वाद सुरू झाला आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
advertisement
बोंबला! सुहागरातला नवरीबाईची अशी डिमांड, नवरदेव गेला तो परत आलाच नाही
वधूच्या कुटुंबाने बोधगया पोलीस ठाण्यात धाव देतली आणि वराच्या वडिलांविरुद्ध हुंड्याची तक्रार दाखल केली. वधूच्या वडिलांनी आरोप केला की लग्नासाठी 10 लाख रुपये आधीच देण्यात आले होते, पण वरमाला घालण्याच्या समारंभात अतिरिक्त 2 लाख रुपये मागितले गेले, ज्यामुळे प्रकरण आणखी वाढलं. वधूच्या बाजूने बोधगया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर वराचे वडील महेंद्र प्रसाद म्हणाले की, हा वाद फक्त रसगुल्ल्यावरून होता, पण वधूच्या कुटुंबाने बोधगया पोलीस ठाण्यात हुंडा मागण्याचा खोटा आरोप करत खटला दाखल केला आहे. खटला दाखल झाल्यानंतरही ते लग्न करण्यास तयार होते, पण वधूच्या कुटुंबाने कोणत्याही परिस्थितीत नकार दिला. दरम्यान वराची आई मुन्नी देवी यांचा आरोप आहे की जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होण्याची शक्यता होती, तेव्हा वधूच्या कुटुंबाने लग्नासाठी असलेले दागिने घेतले आणि वधूसह हॉटेलमधून निघून गेले.
VIDEO : डोक्यावर घुंघट आणि हातात गिटार! एका रात्रीत VIRAL झालं नव्या नवरीचं गाणं, एकदा ऐकाच
ही घटना 29 नोव्हेंबर रोजी घडली असल्याचं वृत्त आहे आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. दोन्ही पक्षांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.
