प्रत्येक सजीव एकमेकांचे अन्न आहे. साप उंदरांची शिकार करतात, तर गरुड सापांची शिकार करतात. त्याचप्रमाणे इतर सजीवांनाही इतर सजीव खातात. पण कधीकधी शिकारीही शिकार बनतो. तज्ज्ञ जंगलात जाऊन सजीवांमध्ये संशोधन करतात. असे फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी ते वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करतात, जे अविश्वसनीय वाटतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर विश्वास ठेवणं कोणालाही कठीण जाऊ शकतं.
advertisement
VIDEO : रात्री रस्त्यावर झोपली व्यक्ती, तिथं आला सिंह, पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नाही
X वर हा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की एका बगळ्या पक्ष्याने अन्नाच्या शोधात एका ईल माशाची शिकार केली. ईल गिळल्यानंतर तो शेकडो फूट उंचीवर आकाशात उडू लागला. पण नंतर त्याच्यासोबत एक धोकादायक अपघात झाला. मासा बगळ्याचं पोट फाडून बाहेर आला. एका फोटोग्राफरने हे आश्चर्यकारक दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आणि सोशल मीडियावर शेअर केले, जे आता वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हायरल चित्रात तुम्हाला दिसेल की बगळा हवेत उडत आहे, त्यानंतर ईल मासा त्याच्या पोटातून बाहेर पडताना दिसत आहे. अमेझिंग नेचरच्या @AMAZlNGNATURE या एक्स अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. इथं वन्यजीव आणि निसर्गाशी संबंधित इतर गोष्टी अनेकदा शेअर केल्या जातात. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एका फोटोग्राफरने बगळ्याच्या पोटातून मासा बाहेर आल्याचा अविश्वसनीय क्षण टिपला आहे, जेव्हा पक्षी उडत होता.' हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
एका सापाला मारलं, समोर अचानक उभे राहिले 50 साप, शेतकऱ्याच्या घरात भयंकर प्रकार
आता बगळा आणि ईलच्या या फोटोवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक छायाचित्रकाराचे कौतुक करत आहेत, तर काही लोक फोटोच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
एका युझरने विचारलं 'माशाने बगळ्याचं पोट कसं कापलं? दुसऱ्या युझरने विचारलं 'पक्षी मेला की जिवंत राहिला? ... आम्हाला स्पष्टपणे सांगा'. तिसऱ्या युझरनं म्हटलं, या फोटोचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, हे चित्र अद्भुत आहे.' तर चौथा युझर म्हणाला 'ईल माशाने बगळ्याचं पोट फाडलं नाही, हे काही कॅमेरा ट्रिक आणि एडिटिंग असावं'. आता लोक या चित्रावर आपापले युक्तिवाद करत आहेत.