VIDEO : रात्री रस्त्यावर झोपली व्यक्ती, तिथं आला सिंह, पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Lion Video Viral : रस्त्यावर माणसाच्या जवळून फिरणाऱ्या या सिंहाच्या एका व्हिडिओमुळे इंटरनेटवर तो खरा की खोटा यावरून वाद सुरू झाला आहे.
नवी दिल्ली : सिंहाचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राणी असो माणूस सिंह म्हटलं की तो त्याची शिकार करणार. अशीच रस्त्यावर झोपलेली एक व्यक्ती सिंहाच्या नजरेस पडली. सिंह त्याच्या जवळ गेला. पण त्यानंतर जे घडलं ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला रस्त्यावर एक व्यक्ती झोपली आहे. इतक्या उजव्या बाजूने एक सिंह येतो. सिंह त्या व्यक्तीजवळ जातो. तेव्हाच आपल्याला धडकी भरते. सिंह आता या व्यक्तीची शिकार करतो की काय अशी भीती वाटते. मात्र घडतं उलटंच. असं काही की अनेकांचा या व्हिडीओवर विश्वास बसत नाही आहे.
सिंह त्या व्यक्तीजवळ जातो पण त्याची शिकार करत नाही. तर तिथून तो निघून जातो. आता सिंह असा का वागला, असा प्रश्न पडतोच. व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून सिंह इतक्या जवळ येऊनही ही व्यक्ती मृत्यूपासून बचावली आहे.
advertisement
व्हिडीओ नीट पाहिला तर तिथल्या दुकानांच्या बोर्डवर गुजरातीमध्ये लिहिलेलं दिसत आहे. यावरून हे दृश्य गुजरातमधील असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तर काहींनी याला एआय जनरेटेड व्हिडीओ म्हटलं आहे.
"भारत में सड़क पर सो रहा एक व्यक्ति शेर का शिकार होने से बच गया, जब शेर उसके पास आया, उसे सूंघा और फिर वहां से चला गया।"
बेशक! जब तक ज़िंदगी लिखी है, कोई कुछ नहीं बिगाड़ सकता...!! pic.twitter.com/tm9aQzXkkZ
— ताज़ा तमाचा (@TazaTamacha) June 7, 2025
advertisement
AI grok ने देखील हा व्हिडीओ पाहिला आणि तो एआय जनरेटेड नसल्याचं म्हटलं आहे. हे दृश्य खरं असल्याचा दावा AI grok ने केला आहे. AI grok ने सांगितलं की, गुजरातमध्ये झोपलेल्या माणसाजवळून सिंह चालत जातानाचा व्हिडिओ खरा वाटतो. सिंह कधीकधी गिर जंगलाजवळील शहरी भागात येतात आणि टाइमस्टॅम्पसारखे सुरक्षा कॅमेऱ्याचे तपशील त्याची सत्यता सिद्ध करतात.
advertisement
सिंहाचं शांत वर्तन असामान्य आहे आणि या विशिष्ट घटनेची पुष्टी करणारे कोणतेही अधिकृत अहवाल नाहीत, ज्यामुळे काही अनिश्चितता आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा आहे की नाही माहिती नाही.
Location :
Delhi
First Published :
June 08, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : रात्री रस्त्यावर झोपली व्यक्ती, तिथं आला सिंह, पुढे जे घडलं ते चमत्कारापेक्षा कमी नाही