एमिली विलिसचे खरे नाव लिट्झी लारा बानुएलोस असे आहे. तिला २७ जानेवारी २०२४ रोजी समिट मॅलिबू येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एमिलीला केटामाइन या अंमली पदार्थाचे व्यसन होते. गेल्या वर्षभरात ती दररोज ५-६ ग्रॅम केटामाइन घेत होती. त्यामुळे एमिलीला मूत्राशयाच्या संदर्भातील आजार, भयस्वप्ने आणि इतर शारीरिक त्रास होत होता. हा त्रास होण्याच्या आधीपासूनच तिला नैराश्य, चिंता आणि पीटीएसडी यांसारख्या मानसिक समस्या होत्या आणि त्यावर एमिली औषधोपचार घेत होती.
advertisement
फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?
उपचार घेत असताना एमिलीच्या प्रकृती झपाट्याने बिघडली. कुटुंबियांनी असा आरोप करण्यात आला आहे की, पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाढत्या शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष केले. उपचार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. एका परिचारिकेला ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि त्यानंतर वैद्यकीय उपचार करण्यात आले. कुटुंबियांनी असा दावा केला आहे की,एमिलीकडे दुर्लक्षित ठेवण्यात आले होते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आणि मेंदूचे गंभीर नुकसान झाले. सध्या ती व्हेजिटेटिव्ह कोमामध्ये आहेत.
राहत्या घरी सापडली मुलाची चिठ्ठी; 'डॅडी मला माफ करा, माझ्या पत्नीची इच्छा आहे...
जर कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केले असते तर एमिलीला तिला त्रास झाला नसता. कोणत्याही रुग्णाला अशा हलगर्जीपणाचा बळी पडावे लागू नये. तिच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एमिलीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे, असे तिचे वकील जेम्स ए. मॉरिस ज्युनियर यांनी सांगितले. या घटनेनंतर एमिलीला युटा येथील एका विशेष केंद्रात हलवण्यात आले. ती सध्या जिवंत असली तरी मेंदूला गंभीर नुकसान झाले आहे. त्यामुळे तिला हालचाल किंवा बोलता येत नाही. फक्त डोळ्यांच्या हालचालींनी ती प्रतिसाद देऊ शकते.
अभिनेत्रीने स्वत:च्या मुलीला १२व्या वाढदिवशी भेट दिले Adult Toy; म्हणाली, तुला..
एमिली विलिस २०१८ मध्ये पॉर्न चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. तिला एव्हीएन अवॉर्ड्समध्ये प्रतिष्ठेचा "परफॉर्मर ऑफ द इयर" पुरस्कार मिळाला होता. मात्र व्यसन आणि मानसिक आरोग्यामुळे तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
