भूताशी संबंधित त्या घटनेची आठवण करून देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, एकदा जंगलाच्या काठावर एक आश्रमही होतं. तिथं जवळ एक ठिकाण होतं, आश्रमातील लोक तिथं भूत आहेत असं सांगत होते. पण प्रेमानंद महाराज त्याचठिकाणी झोपायला गेला. रात्री 9 वाजता ते तिथे गेले, झोपले असता त्यांना जाणवलं की कोणीतरी खूप जड मांड्या असलेला त्याच्यावर चढला आहे.
advertisement
Earthquake : लघवी केली म्हणून भूकंपातूनही वाचला, ढिगाऱ्याखाली दबलेली व्यक्ती 5 दिवसांनी जिवंत
प्रेमानंद महाराज म्हणाले, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते पूर्णपणे शुद्धीवर होते, झोपलेले नव्हते. जेव्हा त्यांनी त्यांचा हात मागे सरकवला तेव्हा त्याने त्यांच्या जटा पकडल्या. पण ते त्यांच्या मनात एक मंत्र जपत होते. मग ते अचानक तो त्यांच्या जागेवरून उठले. त्यांना वाटलं की हा मनाचा भ्रम आहे. आपण नामजप करत आहोत आणि हे असं घडणं शक्य नाही, असं त्यांना वाटलं.
मग ते तिथून बाहेर आला, काही वेळ तिथेच उभे राहिले, मग विचार केला की भूत अस्तित्वात नाहीत. मग ते पुन्हा तिथं गेले आणि चटईवर झोपले. तेव्हा भूत त्यांच्या छातीवर चढला. वजन जास्त असल्याने त्यांचा श्वास थांबला. प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की त्यावेळी त्यांच्या मनात शिवमंत्राचा जप सुरू होता. त्यांनी मंत्र जपाचा वेग वाढवला. त्या मंत्राच्या जपाच्या परिणामामुळे भूत प्रेमानंद महाराजांना सोडून गेले. तो त्यांच्या शरीरापासून वेगळा झाला.
रात्रभर येत होता किंचाळण्याचा आवाज, सकाळी दृश्य पाहूनच सगळ्यांचा उडाला थरकाप
प्रेमानंदजींनी म्हणाले, भूत नकारात्मक शक्ती आहे, जर मंत्र जप चालू असेल तर ते कोणालाही हानी पोहोचवू शकत नाहीत. पवित्र भूत देखील अस्तित्वात असतात, असंही त्यांनी सांगितलं.