चीनमधील 24 वर्षांची मुलगी, यिन शु असं तिचं नाव. तिने तब्बल 8 बॉयफ्रेंड बनवले. गरीब कुटुंबातील असल्याने यिन शुने 5 वर्षांत 10 कोटी कमवून श्रीमंत होण्याची योजना आखली. यासाठी तिने तिच्या सौंदर्याचा वापर शस्त्र म्हणून केला.
'जुनी बायको आणा, नवीन घेऊन जा', अजब ऑफर, जाहिरातीचं पोस्टर VIRAL
सगळ्यात आधी तिने नोकरी सोडली आणि नंतर सुंदर दिसण्यासाठी तिची सर्व सेव्हिंग प्लॅस्टिक सर्जरीवर खर्च केली. यिन शुने फिटनेस रूटीन, चांगल्या ड्रेसिंग स्टाईल शिकल्या आणि सोशल मीडियावर श्रीमंत लोकांना लक्ष्य करायला सुरुवात केली.
advertisement
यिन तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी राहण्याच्या बहाण्याने डिझायनर बेल्ट, महागडे सोफे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरायची. नंतर ती सर्व वस्तू ऑनलाइन सेकंड-हँड प्लॅटफॉर्मवर विकत असे. तिने काही महिन्यांतच 8 श्रीमंत लोकांकडून 2 लाख युआन म्हणजे सुमारे 22 लाख रुपये चोरले.
नवरा की मुलं? महिलांना सगळ्यात जास्त 'ताप' कुणाचा असतो? संशोधनातून झालं उघड
तिच्या नवव्या प्रियकराला अडकवण्याचा प्रयत्न करताना ती पकडली गेली यिन शुयेची चोरी तिच्या नवव्या प्रियकराच्या घरी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या प्रियकराच्या घरी दरोडा टाकताना यिन कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर प्रियकराने पोलिसांना फोन करून बोलावलं आणि यिनला अटक झाली. यिनने पोलिसांसमोर तिचा गुन्हा कबूल केला, त्यानंतर सत्य बाहेर आलं.