'जुनी बायको आणा, नवीन घेऊन जा', अजब ऑफर, जाहिरातीचं पोस्टर VIRAL

Last Updated:

Social media Ad viral : सोशल मीडियावर व्हायरल होणारी जाहिरात. जी पाहून सगळे थक्क झाले आहेत. चक्क जुन्या बायकोच्या बदल्यात नवीन बायको देण्याची ही जाहिरात आहे. जाहिरातीचं पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

News18
News18
नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगू शकत नाही. सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं जलद आणि सोपा मार्ग म्हणून कितीतरी लोक इथं आपल्या जाहिरातीही देतात. अशीच एक सोशल मीडियावर व्हायरल होणारी जाहिरात. जी पाहून सगळे थक्क झाले आहेत. चक्क जुन्या बायकोच्या बदल्यात नवीन बायको देण्याची ही जाहिरात आहे. जाहिरातीचं पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महिलांवर विशेषतः पुरुषांना त्यांच्या पत्नींपासून त्रास होत असताना त्यांच्यावर अनेक विनोद केले जातात. अनेकांना ते आक्षेपार्हदेखील वाटतं. पण तरीही हा विनोदाचा एक लोकप्रिय विषय आहे. याच आशयाची जाहिरात.
जाहिरातीच्या पोस्टरवर म्हटलं आहे की 2025 चा धमाका, त्याखाली 'आकारम बिवी देखभाल सेवा' असं लिहिलं आहे. त्याखाली एका महिलेचा फोटो आहे. त्याखाली मोठ्या अक्षरात लिहिले आहे, जुनी बायको आणा आणि नवीन बायको घेऊन जा. जाहिरातीत होम सर्व्हिसदेखील दिली जात असल्याचं सांगितलं आहे. शेवटी, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहिलेला आहे.
advertisement
advertisement
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर vande_bharat_sach_ki_duniya या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
याला फक्त एका दिवसात 17 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टरवर लोकांनी खूप मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. एका युझरने जाहिरातीची वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न केलाय. जाहिरातीच्या पोस्टरमधील महिला ब्युटी पार्लरची असल्याचं त्यानं सांगितलं.
advertisement
ही एका ब्युटी पार्लरची जाहिरात असल्याचं सांगितलं आहे. ज्यात तुमचीच पत्नी तुम्हाला मेकओव्हर करून नवीन लूकमध्ये मिळेल असं यातून सांगण्याचा उद्देश आहे. दरम्यान ही जाहिरात किती खरी, किती खोटी जाहिरातीबाबत न्यूज18मराठीने पडताळणी केलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'जुनी बायको आणा, नवीन घेऊन जा', अजब ऑफर, जाहिरातीचं पोस्टर VIRAL
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement