कधीकधी आयुष्य असं वळण घेतं की कोणी कल्पनाही करू शकत नाही. स्कॉटलंडमधील 29 वर्षीय हॉली फर्थसोबत असंच काही घडलं. जुलै 2024 मध्ये हॉली एका लग्नाला गेली. तिथे तिला एक पुरुष भेटला. दोघांनी वन-नाईट स्टँड केला. दुसऱ्याच दिवशी हॉलीने गर्भधारणा टाळण्यासाठी मॉर्निंग आफ्टर पिलदेखील घेतली पण नशिबाला काहीतरी वेगळंच हवं होतं. दोन आठवड्यांनंतर हॉलीला कळलं की ती प्रेग्नंट आहे. हॉलीने सांगितलं की तिने यापूर्वीही मॉर्निंग पिल घेतली होती आणि कधीही कोणतीही समस्या आली नाही. पण यावेळी समस्या अशी होती की तिचं ओव्हुलेशन आधीच झालं होतं आणि अशा परिस्थितीत हे औषध प्रभावी ठरलं नसेल.
advertisement
Pregnancy News : 'प्लीज मुलं जन्माला घालू नका, नाहीतर...' एक्सपर्टचा कपल्सना इशारा, सांगितला धोका
पहिल्या स्कॅनिंगमध्ये ती एका मुलाची आई होणार असल्याचं समजलं. पण नंतरच्या तपासात तिच्या पोटात जुळी मुलं असल्याचं निदान झालं. 27 फेब्रुवारी 2025 रोजी हॉलीने दोन सुंदर मुलींना जन्म दिला, शार्लोट आणि रोझ फर्थ. दोन्ही मुली निरोगी आहेत आणि हॉली त्यांचा सांभाळ करत आहे.
पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हॉलीला तिच्या मुलांच्या जैविक वडिलांबद्दल जास्त माहिती नाही. ती व्यक्ती कशी दिसत होती हे तिला आठवतही नाही. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हॉली सांगते, "जेव्हा लोक विचारतात की मुली त्यांच्या वडिलांसारख्या दिसतात की नाही, तेव्हा मी फक्त हसते आणि म्हणते, मला माहित नाही, कारण मी त्यांना फक्त एकदाच पाहिलं होतं आणि तेव्हा मी खूप दारू प्यायले होते"
हॉटेलमध्ये रात्र घालवायला गेलं कपल, 2-4 तासांतच बाबूची अशी अवस्था, पळाली जानू
हॉली आता तिच्या दोन्ही मुलींना सिंगल मदर म्हणून वाढवत आहे. तिने सांगितलं की जरी आयुष्याने तिला मोठा धक्का दिला असला तरी ती आता हे तिचं सौभाग्य मानतं. ती म्हणते, "आई होण्याचा माझा हेतू नव्हता. हे सर्व अचानक घडलं पण आता मला वाटतं की जर हे घडलं नसतं तर माझ्या मुली नसत्या. त्यांना पहिल्यांदाच पाहून मला इतकं प्रेम वाटलं, जे मी आयुष्यात कधीही अनुभवलं नव्हतं. आता मी माझ्या मुलींशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. आम्ही तिघंही नेहमीच एकमेकांसोबत राहू."
द मिररच्या वृत्तानुसार हॉलीने असंही म्हटलं की मुलींच्या बायोलॉजिकल वडिलांनी आतापर्यंत कोणताही संपर्क साधलेला नाही आणि भविष्यातही कदाचित तो तसं करणार नाही. पण जर त्याला कधीही मुलींना भेटायचं असेल तर त्याच्यासाठी दरवाजा नेहमी उघडा असेल.