ती डॉक्टरांकडे गेली पण सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये डॉक्टरांना काहीही आढळलं नाही. एसटीडीची चाचणी देखील सामान्य झाली. डॉक्टरांनी ते बॅक्टेरियल योनिओसिस (बीव्ही) असल्याचं गृहीत धरलं. पण सवानाला काही वेगळंच वाटलं. शेवटी तिसऱ्या तपासणीत, तिच्या लघवीच्या नमुन्यात कापसाचे कण आढळले. तिच्या गर्भाशय ग्रीवाजवळ ते अडकले होते. डॉक्टरांना ते काढावं लागलं.
advertisement
सुदैवाने सवानाला TSS (टॉक्सिक शॉक सिंड्रोम) ची लक्षणं नव्हती. हा एक धोकादायक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे, ज्यामध्ये बॅक्टेरियाने सोडलेलं विष रक्तात पसरतं. यामुळे अवयव निकामी होणं, कोमा आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
तरुणीच्या गर्भाशयात कापसाचे कण गेले कसे?
सवाना जेव्हा मैत्रिणींसोबत बारमध्ये गेली तेव्हा मासिक पाळी असल्याने तिनं टॅम्पॉन घातलं. दुसऱ्या दिवशी ती टॅम्पॉन काढायला गेली पण तिला धागा दिसत नव्हता. तिला वाटलं टॅम्पॉन बाहेर आला असेल. पण खरंतर तो तिच्या शरीरातच अडकला होता. या काळात ती नवीन टॅम्पॉन घालत राहिली, ज्यामुळे जुना टॅम्पॉन आणखी आत ढकलला गेला. तो जुना टॅम्पॉन महिनाभर तिच्या शरीरातच होता.
लोकांनी त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे कारण थोडीशी निष्काळजीपणा त्यांना आजारी बनवू शकते आणि जर स्थिती बिघडली तर मृत्यूदेखील होऊ शकतो.
टॅम्पॉन वापरताना काय काळजी घ्यायची?
बॅक्टेरियाचा प्रसार कमी करण्यासाठी टॅम्पॉन वापरण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत. तुमची नखं लांब असतील तर ती कापा.
तुम्हीही तुमचा प्रवाह आणि गरजेनुसार टॅम्पॉनचा आकार निवडावा.
काही महिला मासिक पाळी नसतानाही टॅम्पॉन्स वापरतात कारण ते त्यांना स्वच्छ ठेवतं किंवा कधी त्यांना रक्तस्राव होईल माहिती नसतं. पण खरंतर टॅम्पॉन्स स्राव शोषून घेतो. यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास पुरेशी जागा मिळते आणि यामुळे चिडचिड, सूज किंवा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे फक्त मासिक पाळीच्या वेळीच टॅम्पन्स वापरा.
सेक्स करण्यापूर्वी टॅम्पॉन काढून टाका. जेणेकरून तो योनीच्या आत जाऊ नये अन्यथा वेदना होऊ शकतात आणि काढणंदेखील कठीण होऊ शकते. यामुळे TSS चा धोका देखील वाढतो.