Dahihandi : मुलांना असं खांद्यावर, डोक्यावर बसवून दहीहंडी दाखवताना सावधान! मोठा धोका, आधी हा VIDEO पाहा

Last Updated:

दहीहंडी, गणपतीच्या काळात गर्दीत लहान मुलांना खांद्यावर, डोक्यावर बसवून ते दाखवणं काही नवीन नाही. मुलांनाही आनंद होतो. पण याचा धोका आहे, जो अनेकांना माहिती नाही.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
मुंबई : श्रीकृष्ण जयंती म्हणजे कृष्णजन्माष्टमीनंतर असतो तो गोपाळकाला किंवा दहीहंडी. त्यानंतर येतात ते गणेशोत्सव. दहीहंडी फोडणं असो वा गणपतीची आगमन आणि विसर्जन मिरवणूक ती पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी असते. कित्येक पालक आपल्या मुलांना दहीहंडी, गणपती दाखवतात ते खांद्यावर किंवा डोक्यावर बसवून. तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर सावध राहा! कारण याचा मोठा धोका आहे.
दहीहंडी, गणपतीच्या काळात गर्दीत लहान मुलांना खांद्यावर, डोक्यावर बसवून ते दाखवणं काही नवीन नाही. गर्दीत लहान मुलांना काही दिसत नाही, शिवाय ते चिरडण्याची शक्यता असते. म्हणून पालक त्यांना आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावर घेतात. तुम्हीसुद्धा तुमच्या वडिलांच्या खांद्यावर असंच बसून दहीहंडी, गणपती पाहिले असतील आणि आता तुमच्या मुलांनाही तुम्ही असंच दाखवत असाल. मुलांनाही आनंद होतो. पण याचा धोका आहे, जो अनेकांना माहिती नाही.
advertisement
एका डॉक्टरांनी मुलांना अशापद्धतीने खांद्यावर, डोक्यावर घेतल्याने त्याचे काय परिणाम होतात हे व्हिडीओसह दाखवलं आहे. डॉक्टरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक व्यक्ती अशाच पद्धतीने एका मुलाला घेते आणि नाचू लागते. काही वेळाने मुलाचा तोल जातो जो त्या व्यक्तीलाही सावरत नाही आणि मुलगा धाडकन खाली जमिनीवर कोसळतो. दृश्य पाहूनच आपल्याला धडकी भरते.
advertisement
ज्या डॉक्टरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे त्यांचं नाव संतोष यादव असं आहे. ते बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी या व्हिडीओत सांगितलं की, अशा पद्धतीने मुलं पडण्याचा आणि डोक्याला मार लागण्याचा धोका आहे. पाय किंवा हाताला फ्रॅक्चर होऊ शकतो. मुलांच्या मानेचे मसल्स कमजोर असतात त्यामुळे त्यांच्या स्पाइनला दुखापत होऊ शकते. श्वास आणि मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. भीती आणि इमोशनल स्ट्रेस निर्माण होई शकतो. मुलांच्या डोक्यावाला, मानेला  आणि शरीराला सपोर्ट द्या.
advertisement
@parentingtips_surat या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तसंच ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जेणेकरून असा धोका टाळता येईल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Dahihandi : मुलांना असं खांद्यावर, डोक्यावर बसवून दहीहंडी दाखवताना सावधान! मोठा धोका, आधी हा VIDEO पाहा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement