व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये नवरदेव स्वतः ड्रायव्हिंग करतो आहे. त्याच्यासोबत नवरी आणि काही नातेवाईकही आनंदाने बसले आहेत. वधू आणि वर दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. ट्रकमध्ये मोठ्या आवाजात लावलेल्या फिल्मी गाण्यांवर दोघेही धमाल करताना दिसत आहेत. पाठवणी करण्यापूर्वी नवरदेवाने ही अनोखी आणि हटके पद्धत का निवडली, यामागचं कारणही सांगितलं आहे. सोनू नावाचा हा नवरदेव म्हणाला की, त्याचं लहानपणापासून एकच स्वप्न होतं की, तो त्याच्या नवरीला स्वतःच्या गाडीतून मोठ्या थाटामाटात घरी घेऊन जाईल.
advertisement
नवरीसाठी फायनान्सवर घेतला ट्रक
सोनूने पुढे सांगितलं की, त्याने हा ट्रक केवळ नवरीला आणण्याच्या स्वप्नासाठी फायनान्सवर घेतला आहे. आता हा ट्रकच त्याच्या रोजगाराचं मुख्य साधन बनला आहे. त्यामुळे लग्नाआधीच त्याने मनाशी ठरवलं होतं की, नवरीची पाठवणी याच ट्रक मधून करायची. नवरदेवाचं हे खास स्वप्न पूर्ण करायला नवरीनेही लगेच आनंदाने होकार दिला. मग काय विचारता, सात फेरे झाल्यानंतर जेव्हा पाठवणीची वेळ आली, तेव्हा फुलांनी आणि रोषणाईने सजवलेल्या ट्रकमध्ये वधू आणि वर मोठ्या थाटामाटात बसले आणि आपल्या नवीन आयुष्याकडे निघाले. या अनोख्या पाठवणीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असून व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
नवरदेवाने स्वतः 100 किमी ट्रक चालवला
खरं तर, हा व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील सांगितला जात आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील राजगुरू पिपरिया येथील रहिवासी सोनू वर्मा याचं लग्न सिवनी जिल्ह्यातील केवलारी येथील सोनम (शिक्षिका) यांच्याशी झालं आहे. 10 मे रोजी सोनम यांची पाठवणी होती. सोनूला लहानपणापासूनच त्याची नवरी स्वतःच्या गाडीतून, खास करून स्वतःच्या ट्रकमधून घरी घेऊन जाण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे त्याने केवळ या दिवसासाठी हा ट्रक खरेदी केला आणि केवलारीहून आपल्या घरी वधूला आणण्यासाठी स्वतः तब्बल 100 किमी ट्रक चालवला.
हे ही वाचा : थकवा, सांधेदुखी, अशक्तपणा? जंगलातील 'हे' छोटंसं झाड अत्यंत उपयोगी; शरीर करतं लोखंडासारखं मजबूत
हे ही वाचा : साडेसाती सुरू आहे? तर येत्या शनि जयंतीला नक्की करा 'हे' उपाय; या 3 राशींना मिळेल दिलासा