हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावातील शेतकरी दत्तराव ग्यानबाराव शिंदे यांचा पाळीव कुत्रा आहे. त्याचं नाव रॉकी. या रॉकी नावाच्या कुत्र्याने आपल्या मालकाला चक्क शेतामध्ये काम करायला मदत केली आहे.
एका सापाला मारलं, समोर अचानक उभे राहिले 50 साप, शेतकऱ्याच्या घरात भयंकर प्रकार
सध्या हळद लागवडीचं काम सुरू आहे. हळदीच्या बेडवर ठिबक सिंचनाचे पाईप अंथरण्यासाठी रॉकी कुत्र्याने मदत केली आहे. अर्धा एकर शेतामध्ये बेडवर ठिबक सिंचनाचा पाईप अंथरायला मदत केली आहे. शेतकऱ्याने रॉकीच्या गळ्याला ठिबकचा पाईप बांधला आणि हा रॉकी क्षणात धावत दुसऱ्या टोकाला पाईप अंथरत जात आहे.
advertisement
शेतकरी मालकाला मदत करणारा हा रॉकी, ज्याचं सध्या कौतुक होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कुत्र्यांना खरंच कळते का माणसांची भाषा?
कुत्रा हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि प्रिय प्राणी समजला जातो. कुत्र्यांना माणसाची भाषा समजते की नाही यावर नेहमीच वाद होत असतात. काही संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कुत्र्यांना माणसाची भाषा समजते. काही शास्त्रज्ञांनी असाही दावा केला आहे, की कुत्र्यांना माणसाची भाषा आजिबात समजत नाही. यासंदर्भात शास्त्रज्ञ काय सांगतात, हे पाहू या.
'इनसाइड युवर डॉग्ज माइंड'च्या माहितीनुसार, ड्यूक युनिव्हर्सिटीचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. ब्रायल हेयर यांच्या संशोधनात एक बाब समोर आली आहे, की कुत्र्यांमध्ये मानवी संवाद समजून घेण्याची क्षमता असते. त्यांनी चेजर या एका कुत्र्याच्या संदर्भाने असं सांगितलं, की त्यानं एक हजाराहून अधिक वस्तूंची नावं शिकून हे दाखवून दिलं आहे की त्याला माणसांची भाषा समजते.
Animal facts : कुत्र्याची शेपटी वाकडी का असते?
मानवी बोलण्यावर कुत्र्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर अटलांटिकच्या यॉर्क विद्यापीठातले संशोधक डॉ. ॲलेक्स बेंजामिन आणि डॉ. केटी स्लोकोम्बे यांनी अभ्यास केला. त्यांच्या संशोधनात 37 मोठ्या कुत्र्यांचा समावेश होता. कुत्र्यांना माणसांची भाषा कळण्याखेरीज त्यांच्या शारीरिक क्रिया आणि हावभावसुद्धा समजत असतात.
सात वर्षांपूर्वी बुडापेस्टच्या इयोटवोस लॉरेन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असं आढळलं होतं, की कुत्र्यांमध्ये जशी माणसांप्रमाणे ऐकण्याची क्षमता आहे, तसं ते बोललेला आवाजही ओळखू शकतात; मात्र नुसता आवाज आणि शब्दांचा आवाज याला फरक मात्र ते ओळखू शकत नाहीत. संशोधनात असं म्हटलं आहे की, कुत्रे हे केवळ माणसाच्या आवाजावर प्रतिक्रिया देत असतात. त्यांच्या शब्दांवर नाही.