TRENDING:

विचित्र, पण मजेशीर! 'या' पठ्ठ्याची बायको विसरली हाॅटेलात; 2 किलोमीटर पुढे गेला अन्...

Last Updated:

सोमवारी रात्री हिंगोली शहरातील नरसी फाटा येथील एका हॉटेलमध्ये नाश्ता झाल्यावर एका दाम्पत्यासोबत मजेशीर घटना घडली. पती आपल्या मुलासह दुचाकीवर बसला आणि...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंगोली : शहरातील नरसी फाटा येथे सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक मजेशीर घटना घडली. एक दाम्पत्य आपल्या मुलासह एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले होते. नाश्ता झाल्यावर पती आपल्या दुचाकीवर बसला आणि त्याच्या मागे त्यांचा छोटा मुलगाही बसला. पण गडबडीत पती आपल्या पत्नीला हॉटेलमध्येच विसरून चक्क दोन किलोमीटर पुढे निघून गेला!
Viral News
Viral News
advertisement

पुढे काय... लोकांनाही लागून राहिली उत्सुकता

पत्नीने त्याला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत पती दूर निघून गेला होता. मागे राहिलेल्या पत्नीला काय करावे कळेना. "माझे पती मला विसरून पुढे निघून गेले". असे लोकांना सांगू लागली. तिथे जमलेल्या लोकांनाही आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.

"प्रवासात, जास्त घाई नको रे बाबा!" 

advertisement

थोड्या वेळाने पतीने मागे वळून पाहिले आणि पत्नी तिथे नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तो लगेच परत हॉटेलच्या दिशेने निघाला. पतीला परत आलेले पाहून पत्नीने सुटकेचा निश्वास सोडला. ही सगळी गडबड घाईमुळे झाली होती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेवर "प्रवासात, जास्त घाई नको रे बाबा!" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेने हेच सिद्ध होते की प्रवासात घाई करणे किती महागात पडू शकते.

advertisement

हे ही वाचा : VIDEO : 'क्या मस्त फिगर है....मेरे साथ चलेगी....' रोड रोमिओचे शब्द ऐकताच शाळकरी मुलीचं धाडसी कृत्य, रस्त्यातच दिला चोप

हे ही वाचा : बोंबला! 4 मुलांचे आईबाप, पती-पत्नी पडले एकाच तरुणीच्या प्रेमात, मग काय झालं तुम्हीच वाचा

मराठी बातम्या/Viral/
विचित्र, पण मजेशीर! 'या' पठ्ठ्याची बायको विसरली हाॅटेलात; 2 किलोमीटर पुढे गेला अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल