त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याची पत्नी घरातील काम करत नाही. यामुळे तो नाराज होता. पत्नीच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या व्यक्तीचा आरोप आहे की, लग्नापूर्वी त्याला हे सांगण्यात आलं नव्हतं की त्याच्या पत्नीला घरातील कामं कशी करावी हे माहित नाही. तिला स्वयंपाक कसा करायचा किंवा कपडे कसे धुवायचे हे माहित नाही. पण त्या व्यक्तीची बायको एका गोष्टीत एक्सपर्ट आहे. ते म्हणजे ऑनलाइन शॉपिंग.
advertisement
हॉस्पिटलमध्ये रडली म्हणून महिलेसोबत अजब प्रकार, प्रकार जाणून कपाळावर माराल हात
त्या व्यक्तीने आपल्या अयशस्वी लग्नासाठी सासूलाही जबाबदार धरलं. त्या व्यक्तीने सांगितलं, की जर त्याच्या सासूने तिच्या मुलीला घरातील कामं करायला शिकवली असती तर आज तिचं आयुष्य थोडं वेगळं झालं असतं. मात्र या संपूर्ण प्रकरणात महिलेच्या आईचं म्हणणं वेगळंच आहे. तिने त्या व्यक्तीवर आरोप केला आणि म्हटलं, की त्याने कोणत्याही मोलकरणीशी लग्न केलं नाही. निदान त्याची बायको सुंदर तरी आहे. यावर त्याचं समाधान झालं पाहिजे. पतीने पत्नीला माहेरी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे