इंस्टाग्रामवरील @smartprem19 या अकाउंटवर आयडीबीआय बँकेच्या एका धनादेशाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. हा धनादेश संगीता नावाच्या महिलेने भरला असून तिने इतक्या विचित्र पद्धतीने तो भरला आहे की तो वाचून कोणालाही धक्का बसेल. चेकवरील तारीख डिसेंबर २०२४ ची आहे.फोटोमध्ये दिसते की, लाभार्थ्याच्या नावाच्या ठिकाणी संगीता लिहिले आहे. मात्र, ज्या ठिकाणी रक्कम शब्दांत लिहिणे अपेक्षित होते तिथे तिने 'जितके पैसे बँकेत आहेत!' असे लिहिले आहे. बँकेतून जितके पैसे काढणे अपेक्षित होते ते लिहण्या ऐवजी बँकेतील सगळे पैसे लिहल्याने चेक पाहून कॅशियरला देखील घाम फुटला असेल.
advertisement
सचिन तेंडुलकर शाळेतील मुलासारखा रडला, Pain Killer घेऊन झळकावले होते शतक
व्हायरल झालेल्या धनादेश खरा असल्याचे दिसते. कारण चेकवर खाते क्रमांकही दिसत आहे. पण न्यूज १८ मराठीने हा चेक खरा असल्याची सत्यता तपासलेली नाही.
Share Market: फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी केली भविष्यवाणी?
काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाची डिपॉझिट स्लिप व्हायरल झाली होती. ज्यात एका महिलने रोख/चेकच्या तपशीलात लिहिलं आहे तेथे मला माझ्या पतीसोबत जत्रेत फिरायला जायचं आहे, असे म्हटले होते. याशिवाय राशी रकाण्यात कुंभ लिहिलं आहे. म्हणजेच, तिनं तिच्या कुंडलीतील रास सांगितली आहे. खाली जिथं टोटल पैशाची रक्कम लिहायची होती, तिथं तिनं कुंभमेळा लिहिलं आहे.
