बर्फ बनवतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुमची बाहेर कुठे बर्फ खाण्याची किंवा बर्फापासून बनणारे पदार्थ खाण्याची इच्छाही होणार नाही. हा बर्फ बनवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
कुत्रे एका बाजुला डोकं का वाकवतात? शास्त्रज्ज्ञांनी सांगितलं कारण
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बर्फ बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे. गोला चुस्की बनवण्यासाठी बर्फाचा चुरा प्रत्यक्षात नाल्याच्या पाण्यातून तयार केल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र, अनेकांनी हे खोटं म्हटलं आहे. बर्फ तयार करताना लोक त्यावर चप्पल घालून चढतानाही दिसतायेत.
advertisement
तुम्ही घरी फ्रीजमध्ये बर्फ सहज साठवू शकता. ज्या साच्यात तुम्ही पाणी टाकाल, त्याच आकारात बर्फ गोठेल. घरी, बर्फ लहान चौकोनी तुकड्यांमध्ये गोठलेला असतो, परंतु कारखान्यात, बर्फाचे मोठे तुकडे असतात. या सिलीची निर्मिती मीडियावर शेअर करण्यात आली. यामध्ये प्रथम मोठ्या पेट्यांमध्ये पाणी भरण्यात आले. त्यानंतर ते गोठवण्यात आलं. डब्यातील बर्फ काढण्यासाठी त्यावर पाणी टाकण्यात आले. व्हिडिओमध्ये हे बर्फ ट्रकवर चढवताना मजुरांनी चप्पल घातलेली दिसत आहे.
दरम्यान, liveforfood007 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक कमेंट येताना दिसत आहेत. अनेकांनी व्हिडिओमध्ये दिलेली माहिती चुकीची असल्याचx म्हटले आहे. एका व्यक्तीने लिहिले आहे की, त्याची एक बर्फाची फॅक्टरीही आहे. अशा प्रकारे गोठलेला बर्फ खाण्यासाठी वापरला जात नाही. याचा उपयोग मृतदेह ठेवण्यासाठी किंवा काहीही ठेवण्यासाठी केला जातो. हा व्हिडिओ चुकीची माहिती देत आहे.
