कुत्रे एका बाजुला डोकं का वाकवतात? शास्त्रज्ज्ञांनी सांगितलं कारण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
माणूस कुत्र्याला जेवढा जीव लावतो तेवढाच कुत्राही माणसांना लावतो. कुत्र्यांविषयी अनेक वेगवेगळे इंटरेस्टिंग फॅक्ट समोर येत असतात.
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : अनेक वेगवेगळे प्राणी, पक्षी लोक पाळतात. पाळीव प्राण्यांपैकी सर्वात प्रामाणिक, विश्वासू म्हणून कुत्र्याची ओळख आहे. कुत्रा मालकाचं ऐकतो, संकटात असेल तर वाचवण्यासाठी लगेच धावतो. माणूस कुत्र्याला जेवढा जीव लावतो तेवढाच कुत्राही माणसांना लावतो. कुत्र्यांविषयी अनेक वेगवेगळे इंटरेस्टिंग फॅक्ट समोर येत असतात. अशाच एका फॅक्टविषयी जाणून घेऊया.
तुम्ही कुत्र्याला अनेकदा डोकं वाकडं करताना पाहिलं असेल. मात्र कुत्रा आपलं डोकं एक साईडला का झुकवतो याविषयी तुम्हाला माहितीय का? शास्त्रज्ञांनी आता या गोष्टीविषयी उलगडा केला आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया.
माणूस एखादा विचार करत असल्यावर त्याचं डोकं आपोआप एका बाजूला जातं. कुत्र्यांचंही तसंच आहे. कुत्र्यांचा स्वभाव सारखाच आहे. इओटवोस लॉरँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले की, अनेक प्राणी जगाची दृष्ये, आवाज आणि वास अनुभवताना डोकं एका बाजुला झुकवतात. संशोधनाच्या प्रमुख लेखिका आंद्रिया सोम्स म्हणाल्या, 'आम्ही कुत्र्यांच्या मालकांना वेगवेगळ्या खेळण्यांची नावं सांगण्यास सांगितलं. यावेळी कुत्र्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला. त्याच्या डोक्याची हालचाल आणि मालकाचा आवाज यात विशेष संबंध असल्याचं आम्हाला आढळलं. आवाजाच्या स्वरानुसार कुत्र्याचं डोकं झुकतं. मालक त्यांना समजावण्याच्या नादात काही बोलतात, तेव्हा कुत्र्यांना डोकं वाकवून लक्षपूर्वक ऐकायला आवडतं.
advertisement
रिपन कॉलेजच्या शास्त्रज्ञ ज्युलिया मनोर म्हणतात की, माणूस आणि पक्षीही हेच करतात. अशा अनेक प्रजाती आहेत जे आपलं डोकं अशा प्रकारे एका बाजुला झुकवतात. जेणेकरून त्यांना आवाज चांगला ऐकू येईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2023 9:28 AM IST


