बोगस दस्तावेज तयार करून माजलगावमध्ये मोक्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तीन जणांवर गुन्हा दाखल

Last Updated:

बीडमध्ये भूमाफिया आणि गावगुंडांनी बनावट दस्तावेज करून जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे.

News18
News18
बीड: बीडच्या माजलगाव शहरातील जुन्या मोंढा परिसरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या लाखो रुपयांच्या वादग्रस्त जमिनीची बेकायदा खरेदी-विक्री करून जागा हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आडत व्यापारी बाळासाहेब तुकाराम जोगडे यांच्यासह अन्य तिघांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक हे यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.
माजलगाव शहराजवळील देवखेडा येथील रहिवासी राजाराम धोंडीराम जोगडे यांची जुन्या मोंढा भागात सुमारे 1800 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाची जागा होती. त्यांच्या मृत्यूनंतर वारस नसल्याने नातेवाईकांनी मालकी हक्काचा दावा केल्यामुळे ही जागा वादग्रस्त ठरली होती. बाळासाहेब जोगडे यांनी बोगस ना हरकत प्रमाणपत्र तयार करून सदर जागेची 15 सप्टेंबर 2025 रोजी प्रल्हाद सूर्यकांत होके यांना रजिस्ट्री करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी जुनी पीटीआर वापरण्यात आली असून तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक गणेश चौधरी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप आहे.
advertisement

कोणावर गुन्हा दाखल झाला? 

या प्रकरणात बाळासाहेब तुकाराम जोगडे (रा. देवखेडा) मालमत्ता विक्रेता प्रल्हाद सूर्यकांत होके(रा. पाटील गल्ली, माजलगाव) मालमत्ता खरेदीदार इमरान मुस्तफा खान (रा. गांधनपुरा, माजलगाव) – साक्षीदार , प्रकाश उत्तमराव होके (रा. पाटील गल्ली, माजलगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगावात जमीन हडपण्याचे प्रकार वाढले

माजलगाव आणि आसपासच्या परिसरातील जमिनीचे भाव दिवसागणिक प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि गावगुंडांनी बनावट दस्तावेज करून जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. गुंडागर्दी करून, धमकावून, जमिनीवर कब्जा करण्याचे प्रयत्न होत आहेत. वेळीच या गुंडांना आवरले नाही तर शांत आणि वास्तव्यासाठी सुरक्षित अशा माजलगावची असलेली ओळख धूसर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बोगस दस्तावेज तयार करून माजलगावमध्ये मोक्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तीन जणांवर गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement