TRENDING:

कधी शिरलाच घरात साप, तर करायचं काय? हा सोपा उपाय तुम्हाला माहित असायलाच हवा

Last Updated:

साप कितीही विषारी असला तरी इतर कोणत्याही शिकाऱ्यापेक्षा माणसांना प्रचंड घाबरतो. म्हणूनच माणूस जवळ येताच त्याच्यावर झडप घालतो, असं तज्ज्ञ सांगतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राधिका, प्रतिनिधी
सर्वच साप विषारी नसतात. त्यामुळे घाबरण्याचं कारण अजिबात नाहीये.
सर्वच साप विषारी नसतात. त्यामुळे घाबरण्याचं कारण अजिबात नाहीये.
advertisement

इंदोर : साप हा जगातला सर्वात विषारी प्राणी मानला जातो. म्हणून कितीही धाडसी व्यक्ती असली, तरी ती सापाला बघून घाबरतेच. पावसाळ्यात तर सगळीकडे सापांचा सुळसुळाट असतो. ग्रामीण भागात अगदी घरातही साप घुसतात. पावसाळा आता तोंडावर आहे. त्यामुळे आज आपण सापांना पळवण्याचा एक सोपा उपाय पाहणार आहोत. या उपायामुळे साप घरात शिरणं दूरच, तुमच्या घराकडे वळून पाहणारही नाही.

advertisement

सापाविषयी आपल्या मनात एवढी भीती असते की, अनेक मृत्यू हे सर्पदंशाने नाही, तर नुसत्या भीतीनेच होतात. परंतु जरा सतर्कतेने विचार केला तर तुम्ही सापाला शांतपणे पळवून लावू शकता. शिवाय सर्वच साप विषारी नसतात. त्यामुळे घाबरण्याचं कारण अजिबात नाहीये.

हेही वाचा : Snake News: साप चावल्यावर सर्वात आधी काय करावं? कोणता साप किती विषारी? – News18 मराठी (news18marathi.com)

advertisement

साप कितीही विषारी असला तरी इतर कोणत्याही शिकाऱ्यापेक्षा माणसांना प्रचंड घाबरतो. म्हणूनच माणूस जवळ येताच त्याच्यावर झडप घालतो, असं तज्ज्ञ सांगतात. असं म्हणतात की, जगभरातील 60 ते 70 टक्के साप विषारी नसतात. परंतु सापाला पहिल्या पहिल्या तो विषारी आहे की नाही, हे सांगता येत नाही. ते त्याने दंश केल्यानंतरच कळतं. परंतु तशी वेळ येऊच देऊ नये.

advertisement

सापांना प्रकाश सहन होत नाही, म्हणून ते कायम अंधार शोधत असतात. त्यांच्या डोळ्यांना अंधारात स्पष्ट दिसतं, तर प्रकाशाचा त्यांना त्रास होतो. इतकंच नाही, तर प्रखर उन्हाने सापांची दृष्टी जाऊसुद्धा शकते. याचाच अर्थ असा आहे की, अंधाऱ्या भागात साप दिसल्यास तिथे प्रकाश करून तुम्ही त्याला पळवून लावू शकता. शिवाय सापांना मोठा आवाजही सहन होत नाही. त्यामुळे जर पावसाळ्यात घरातल्या अडगळीच्या, अंधाऱ्या खोलीत साप शिरला, तर तिथे प्रकाश करून जोरजोरात भांडी वाजवून त्याला पळवून लावा, असं तज्ज्ञ सांगतात.

advertisement

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा 

मराठी बातम्या/Viral/
कधी शिरलाच घरात साप, तर करायचं काय? हा सोपा उपाय तुम्हाला माहित असायलाच हवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल