मिझोरममधील झिओनाने दोन नाही, तीन नाही तर एकूण 39 लग्न केली. 39 लग्न ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल. पण यापेक्षाही मोठा धक्का म्हणजे त्यांच्या सगळ्या पत्नी एकाच घरात एकच छताखाली राहतात. या सर्व महिला बहिणींप्रमाणे प्रेमाने एकत्र राहतात.
Chanakya Niti : अनेक पुरुष करतात दुर्लक्ष, चाणक्यनीतीत सांगितलीये बायकोपेक्षाही महत्त्वाची गोष्ट
advertisement
39 बायकांपासून त्यांना 94 मुलं झाली. काही लोक म्हणतात की जुआनाला 89 मुलं होती, परंतु अनेक ठिकाणी ही संख्या 94 आहे. त्याला 36 नातवंडंही आहेत. जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचा प्रमुख असल्याचा विक्रम झिओनाच्या नावावर आहे.
आता इतकी लग्न केली, इतक्या पत्नी, इतकी मुलं. राहण्यासाठी घरंही तितकंच मोठं हवं. यासाठी जुआनाने शंभर खोल्या असलेलं एक आलिशान घर बांधलं. या घराचं नाव चुआर थान रन आहे, ज्याचा अर्थ नवीन युगाचं घर आहे. जुआनामुळे अनेक पर्यटक राज्यात येतात.. एकाच घरात इतक्या सह-बायका एकत्र कशा राहू शकतात हे जाणून त्यांना आश्चर्य वाटायचं. पण जेव्हा लोक इथं आले तेव्हा त्यांना त्यांच्या बायकोंमधील प्रेम पाहून आश्चर्य वाटलं.
General Knowledge : प्रपोज करण्यासाठी एका गुडघ्यापर्यंत का बसतात?
झिओनाचं 2021 मध्ये निधन झालं. पतीच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पत्नी वेगळ्या झाल्या नाहीत. त्या त्याच घरात एकाच छताखाली राहत आहेत.