General Knowledge : प्रपोज करण्यासाठी एका गुडघ्यापर्यंत का बसतात?

Last Updated:
Propose on knee : तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं असेल किंवा तुम्हाला कुणीतरी असं प्रपोज केलं असेल. पण प्रपोज करताना गुडघ्यावरच का बसतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
1/7
गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईन आठवडा गेला. या आठवड्यात एक प्रपोज डे देखील असतो, ज्या दिवशी प्रेमी त्यांचे प्रेम व्यक्त करतात. पण तसं प्रपोज करण्यासाठी कोणताही विशिष्ट दिवस नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला हे कधीही सांगू शकता आणि जर तुमचं नातं मजबूत झालं असेल तर तुम्ही लग्नासाठी प्रपोज देखील करू शकता.

advertisement
2/7
आता तर तुम्ही लग्न किंवा साखरपुड्यात पाहिलं असेल. एका गुडघ्यावर बसून अंगठी किंवा हार घातला जातो. पण प्रेम व्यक्त करताना, प्रपोज करताना एकाच गुडघ्यावर का बसतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

3/7
मेंटल फ्लॉस वेबसाइटनुसार, पूर्वी लोक देवासमोर एका गुडघ्यावर बसत असत. प्राचीन काळात गुडघे टेकणं हे आदराचं प्रतीक होतं. सामाजिक किंवा प्रशासकीय रचनेत उच्च पदावर असलेल्यांना लोक गुडघे टेकून आदर देत असत.

4/7
ही प्रथा पर्शियन साम्राज्यात सुरू झाली, असं मानलं जातं. जेव्हा अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्य जिंकलं तेव्हा त्याने राज्यातही ही प्रथा स्वीकारली. या पद्धतीला प्रोस्कायनेसिस असं म्हणतात.

5/7
बासेल वेबसाइटनुसार, गुडघे टेकण्याची प्रथा कदाचित शूरवीरांमध्ये प्रेमाशी जोडली गेली असावी. शूरवीर म्हणजे कोणत्याही राज्यात महान कृत्ये करणारे लोक किंवा घोड्यांवर बसून युद्धे करणारे सैनिक.

6/7
अकराव्या शतकाच्या सुमारास, शूरवीर त्यांच्या राज्यांच्या दरबारात उच्चपदस्थ महिलांच्या प्रेमात पडू लागले. हे प्रेम शारीरिक पातळीवर नव्हतं. ज्याप्रमाणे हे शूरवीर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी राजा किंवा राणीसमोर एका गुडघ्यावर बसायचे, त्याचप्रमाणे ते त्यांच्या मैत्रिणींसमोर बसून त्यांना सुरक्षित ठेवण्याचे वचन देत असत.

7/7
त्या काळातील अनेक चित्रांमध्ये, चित्रकारांनी शूरवीर किंवा इतर पुरुषांना महिलांसमोर एका गुडघ्यावर बसलेलं दाखवलं आहे. इथून पुढे गुडघे टेकणं हे प्रेमाचे प्रतीक बनलं आणि लोक त्यांच्या मैत्रिणींसमोर एका गुडघ्यावर बसून त्यांचे प्रेम व्यक्त करू लागले.  हळूहळू ते प्रेमाचं प्रतीक बनलं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement