TRENDING:

लग्नात भयानक प्रकार, व्हिडिओ शुटच्या वेळी Colour Bombचा स्फोट; वधूच्या जखमी अवस्थेचा video व्हायरल

Last Updated:

कॅनडातील विकी आणि पिया या भारतीय वंशाच्या जोडप्याच्या लग्नसोहळ्यात आनंदाचा क्षण दुःखद ठरला. फोटोशूटदरम्यान रंग बॉम्ब चुकीच्या दिशेने जाऊन थेट वधूवर आदळला, त्यामुळे ती जखमी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बेंगळुरू: कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याच्या लग्नाचा आनंददायक सोहळा एका भयानक घटनेत बदलला. रंगीत धुराचे मोठे आकर्षक दृष्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगीत बॉम्बमुळे (Colour Bomb) नववधू जखमी झाली. या घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडले.
News18
News18
advertisement

विकी आणि पिया या जोडप्याच्या लग्नाचे चित्रीकरण करत असताना ही घटना घडली. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये विक्कीने पियाला उचलून फोटो काढण्यासाठी उभे केले. तेव्हा रंगीत बॉम्ब नीट ओपन झाला नाही आणि तो पियाच्या अंगावर आदळला. या अपघातामुळे पियाच्या पाठीला भाजले आणि तिचे केसही जळाले. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

advertisement

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, आम्ही या सुंदर रंगीत बॉम्बचा वापर पार्श्वभूमीवर एक आकर्षक फोटो काढण्यासाठी केला होता. पण तो बिघडला आणि थेट आमच्यावर आदळला. हा फोटो काढताना आम्ही आमच्या बाळालाही हातात घेणार होतो.

या घटनेवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आणि जोडप्यावर टीका केली. रंगीत बॉम्बच्या इतक्या जवळ उभे राहणे धोकादायक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. हे खूप भयानक आहे, पण तुम्ही त्याच्या अगदी जवळ उभे आहात, असे एका युझरने म्हटले आहे. दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, हे सामान्य ज्ञानाचे आहे. फटाक्यांच्या जवळ उभे राहू नये. जरा विचार करा.

advertisement

एका वेडिंग प्लॅनरने या घटनेवर मत व्यक्त करताना म्हटले आहे की, वेडिंग प्लॅनर म्हणून, मला समारंभात रंगीत धुराचे बॉम्ब वापरताना सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करायचे आहे. हे पायरोटेक्निक्स आहेत आणि योग्यरित्या हाताळले नाही तर ते धोकादायक ठरू शकतात. सुरक्षित अंतर (मंडपातून ५-१० फूट) ठेवल्याने केवळ सुरक्षितता सुनिश्चित होत नाही. तर नैसर्गिक देखाव्यासाठी धुराचे चांगले फैलाव देखील होते. पायरोटेक्निक्स वापरताना सर्व कार्यक्रम व्यावसायिकांनी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे.

advertisement

गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. एका व्यक्तीने कारच्या सनरुफमधून फटाके फोडताना दिसला. त्याने बंदूक वापरून फटाके उडवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा अचानक फटाक्यांना आग लागली. यामुळे त्याच्या हातातले फटाके फुटले आणि ठिणग्या कारवर पडल्या, ज्यामुळे कारला आग लागली.

मराठी बातम्या/Viral/
लग्नात भयानक प्रकार, व्हिडिओ शुटच्या वेळी Colour Bombचा स्फोट; वधूच्या जखमी अवस्थेचा video व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल