काखेत घाम आल्याने अंगाला दुर्गंधी येऊ लागते. यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी किंवा घाम येऊ नये म्हणून लोक वेगवेगळे उपाय शोधत राहतात. पण एका देशात या घामाचा वापर करून एक अजब डिश बनवली जात आहे. आश्चर्य म्हणजे लोकही हा पदार्थ आवडीनं खात आहेत. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही डिश आता जपानमधील रेस्टॉरंटमध्येही मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वेबसाइटनुसार, हा जपानचा खूप जुना नाश्ता आहे.
advertisement
पक्ष्यांची विष्ठा जीवघेणी, माणसाचा होऊ शकतो मृत्यू; तज्ज्ञांची धक्कादायक माहिती
ओनिगिरी नावाचा पदार्थ जपानमध्ये प्रसिद्ध आहे. हा भाताचा गोळा आहे, जो लोक लाडूसारखे हाताने बनवतात आणि खातात. पण आता या डिशमध्ये काहीतरी वेगळं केलं आहे. त्यात काखेतील घाम घालण्याची परंपरा सुरू झाली आहे, त्यामुळे याला बगल ओनिगिरी असं म्हणतात.
कसा बनवला जातो बगल ओनिगिरी?
ज्या तरुणीच्या काखेत हा भात बनवला जाणार आहे, ती तरुणी काख स्वच्छ धुते. मग खूप व्यायाम करते, ज्यामुळे तिला घाम येतो. मग तरुणी तिच्या काखेत भाताचा गोळा ठेवते, त्याला आकार देते आणि घामाने मऊ करते. मग ते लोकांना खायला देतात.
चवीने खातात लोक
ही डिश अनेक रेस्टॉरंटमध्ये पुन्हा चढ्या दराने विकली जात आहे. अहवालानुसार, अनेक ठिकाणी ते 10 पट अधिक महागात विकले जात आहे. एका व्यक्तीने ही डिश खाल्ली आणि सांगितलं की त्याची चव सामान्य भातापेक्षा अजिबात वेगळी नाही. अनेक रेस्टॉरंट्सनी तर त्यांच्या ग्राहकांना स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी दिली आणि ही डिश तयार केल्याचंही दाखवलं.
OMG! 40 वर्षे प्रेग्नंट होत राहिली ही महिला, दिला 69 मुलांना जन्म; डॉक्टरही आश्चर्यचकीत
2013 मध्ये एक संशोधन करण्यात आलं. ज्यामध्ये असं आढळून आलं की शरीराच्या काही भागांमध्ये तयार होणाऱ्या घामामध्ये फेरोमोन्स असतात, ज्याचा वास घेतल्यावर किंवा चाटल्यास मानवी भावना सुधारू शकतात.