पक्ष्यांची विष्ठा जीवघेणी, माणसाचा होऊ शकतो मृत्यू; तज्ज्ञांची धक्कादायक माहिती
- Published by:Priya Lad
Last Updated:
पक्ष्याची विष्ठा पडली म्हणून घाण वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का? हीच विष्ठा तुमचा जीवही घेऊ शकते. तज्ज्ञांनी पक्ष्यांबाबत नुकताच अलर्ट जारी केला आहे. पक्ष्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : रस्त्यावर, रस्त्याने चालताना अंगावर पक्ष्याची विष्ठा पडली. असं तुमच्यासोबत कधी ना कधी झालं असेल. पक्ष्याची विष्ठा पडली म्हणून घाण वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का? हीच विष्ठा तुमचा जीवही घेऊ शकते. आता विष्ठेमुळे माणसाचा मृत्यू होतो असं कुणी तरी ज्योतिषानं सांगितलं असं तुम्हाला वाटेल. पण हे वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
सकाळ होताच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. हा किलबिलाट ऐकला की मन अगदी प्रसन्न होतं. आपल्या आसपास पक्षी राहावेत म्हणून लोक बाल्कनी आणि गच्चीत पक्षी येण्यासाठी तशी सोय करतात. म्हणजे विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्यासाठी दाणे-पाणी ठेवतात. जेणेकरून ते खाण्यापिण्यासाठी तिथं येतील. पण असं करणं धोकादायक ठरू शकतं, का असा प्रश्न आता वैज्ञानिकांच्या इशाऱ्यानंतर पडला आहे.
advertisement
पक्ष्यांबाबत हायअलर्ट
अलीकडेच ब्रिटनमध्ये पक्ष्याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पक्ष्यांच्या विष्ठेपासून जपून राहण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे. पक्ष्यांची विष्ठा माणसांसाठी जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे रस्त्याने चालताना तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर तुम्हाला ही विष्ठा दिसली तर चुकूनही स्पर्श करू नका. यामुळे तुमचा जीव जाण्याचा धोका आहे.
advertisement
काय आहे कारण?
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ब्रिटनचे कीटक नियंत्रण प्रमुख पॉल ब्लॅकहर्स्ट यांनी इशारा दिला आहे की, वसंत ऋतूमध्ये सीगल्स त्यांच्या विषारी विष्ठेने लोकांचा जीव घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा. कारण त्यांच्या विष्ठेत घातक ई-कोली आणि साल्मोनेला बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे घातक संसर्ग होऊ शकतो. वाळलेली विष्ठा श्वासाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आताची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे कारणया हंगामात अनेक सीगल घरांवर घिरट्या घालतात. अनेकजण त्यांच्यासाठी घरटी देखील बनवतात, जेणेकरून ते येऊन राहू शकतील. शास्त्रज्ञ म्हणतात असं अजिबात करू नका.
advertisement
बऱ्याच पक्ष्यांचे मल धोकादायक
फक्त सीगलच नाही तर अनेक पक्ष्यांचे मल धोकादायक असते. पक्षी त्यांच्यासोबत 60 हून अधिक रोग आणि जीवाणू घेऊन जातात. यापैकी अनेक मानवांसाठी घातक ठरू शकतात. पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये विविध जीव आणि कीटक देखील असतात जे थेट संपर्कात आल्यास समस्या निर्माण करू शकतात.
Location :
Delhi
First Published :
May 03, 2024 11:41 AM IST