OMG! 40 वर्षे प्रेग्नंट होत राहिली ही महिला, दिला 69 मुलांना जन्म; डॉक्टरही आश्चर्यचकीत

Last Updated:

वैद्यकीय शास्त्रानुसार आजपर्यंत कोणालाही 16 पेक्षा जास्त मुलं झाली नाहीत. त्यामुळे एका महिलेने एवढ्या मुलांना जन्म देण्याची कल्पना अशक्य वाटू शकते, परंतु एका मठाशी संबंधित असलेली महिला जिच्या प्रेग्नन्सीबाबत मठानंच माहिती दिली आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
मॉस्को :  एका महिलेनं 40 वर्षांत 69 मुलांना जन्म दिला. वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल. हे शक्यच नाही, असं तुम्ही म्हणाल. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या महिलेबाबत समजल्यानंतर खरंतर तुम्हीच काय डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत. पण या महिलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येसुद्धा आहे.
रशियाच्या शुया भागात राहणारी ही महिला. मॉस्कोतील निकोल्स्क एका मठाशी संबंधित होती. या मठानं रशियन सरकारला दस्तावेज सादर केलं. ज्यात या महिलेच्या प्रेग्नन्सीबाबत माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार आजपर्यंत कोणालाही 16 पेक्षा जास्त मुले झाली नाहीत. त्यामुळे एका महिलेने एवढ्या मुलांना जन्म देण्याची कल्पना अशक्य वाटू शकते, परंतु मठांनी दिलेल्या अहवालात याचा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. तिच्या पतीचं नाव फ्योडोर वासिलिव्ह असल्याचं मठाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
advertisement
महिलेला कशी झाली 67 मुलं?
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, मॉस्कोमधील निकोल्स्क मठानं दिलेल्या माहितीनुसार, 1725 ते 1765 दरम्यान फ्योडोर वासिलिव्हची पत्नी 27 वेळा गर्भवती झाली. या काळात तिला 16 वेळा जुळी, 7 वेळा तिळी झाली आणि 4 वेळा तिनं एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला. म्हणजेच एकाच महिलेच्या पोटातून एकूण 69 मुलं जन्माला आली.
advertisement
फ्योडोरच्या दुसऱ्या बायकोला 18 मुलं
तुम्हाला आश्चर्य वाटेल फ्योडोरनं आणखी एका महिलेशी लग्न केलं. ती 8 वेळा गरोदर राहिली आणि तिनं 18 मुलांना जन्म दिला. यापैकी 6 वेळा जुळी मुलं जन्माला आली. जर आपण या प्रकारे पाहिलं तर वासिलिव्हच्या दोन पत्नींना एकूण 87 मुलं जन्माला आली. त्यापैकी 84 जिवंत राहिली, उर्वरित 7 मुलांचा जन्मानंतर काही दिवसांनी मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.
advertisement
त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावांची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. परंतु काही लोकांचा असा दावा आहे की पहिल्या पत्नीचं नाव व्हॅलेंटिना वासिलिव्ह होतं आणि ती 76 वर्षे जगली. जेव्हा तिच्या मुलांची कागदपत्रं सरकारला देण्यात आली तेव्हा ती जिवंत होती आणि तिचं वय 75 वर्षे होतं.
advertisement
ही महिला तिच्या आयुष्यात एकूण 27 वेळा गरोदर राहिली आणि बहुतेक वेळा तिनं जुळी, तिळी किंवा चार मुलांना जन्म दिला. सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहे.
एकाच महिलेला इतकी मुलं होणं शक्य आहे का?
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या पुनरुत्पादन विभागाचे संचालक जेम्स सेगर्स यांच्या म्हणण्यानुसार, हे शक्य वाटत नाही. सर्वात आधी 40 वर्षांमध्ये एक स्त्री 27 वेळा गर्भवती कशी होऊ शकते याचा विचार करा. त्यासाठी पुरेसा वेळ मिळेल का? जर तुम्ही आकडे बघितले तर तुम्ही म्हणाल की हे शक्य आहे, परंतु तीन आणि चार मुलांचा जन्म सहसा खूप दिवसांनी होतो. मग या महिलेला सतत जुळी मुलं कशी होत राहिली, असा प्रश्न पडतोच.
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! 40 वर्षे प्रेग्नंट होत राहिली ही महिला, दिला 69 मुलांना जन्म; डॉक्टरही आश्चर्यचकीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement