सलग 3 दिवस चालणारा हा लग्नसोहळा इटलीमधील व्हेनिसमध्ये पार पडला. त्यांनी आपली गर्लफ्रेंड लॉरेन सांचेजसोबत 27 जून रोजी लग्न केलं. हा लग्नसोहळा इतका आलिशान आणि शाही होता की तो जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक मानला जात आहे.
या ‘रॉयल वेडिंग’मध्ये हॉलिवूड, व्यवसाय, राजकारण आणि ग्लॅमरस दुनियेतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, भारतातून केवळ एकाच व्यक्तीला आमंत्रण मिळालं ती म्हणजे नताशा पूनावाला. त्या एक यशस्वी उद्योजिका आणि फॅशन आयकॉन आहेत.
advertisement
या लग्नासाठी व्हेनिसमधील तीन प्रेक्षणीय ठिकाणांची निवड करण्यात आली होती. एक ऐतिहासिक चर्च, एक सुंदर बेट आणि एक अशी ऐतिहासिक वास्तू जिथं पूर्वी जहाजं तयार केली जायची. या सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. या लग्नाचं फक्त डेकोरेशन आणि वेन्यू बुकिंगवरच 40 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला. या एवढ्या पैशात तर भारतात 10 ते 12 एक सेलिब्रिटी किंवा ग्रँड लग्नाचा सोहळा पार पडला असता, अशी चर्चा भारतीयांकडून होतेय. सोशल मीडियावर याबद्दल कमेंट्स देखील केले जात आहेत.
गेस्टसाठी 97 प्रायव्हेट प्लेन्स आणि वॉटर टॅक्सींची सोय होती. एवढंच नव्हे तर शहरातील सर्वात महागड्या हॉटेल्समध्ये पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिथं एका रात्रीचा भाडं 2 लाख रुपये इतकं होतं.
खाण्याची जबाबदारी जगप्रसिद्ध शेफकडे सोपवण्यात आली होती आणि दररोजच्या मेजवानीवर 3 कोटी रुपयांहून अधिक खर्च होत होता.
या संपूर्ण लग्नसोहळ्यावर एकूण ₹478 कोटी खर्च करण्यात आला होता. विशेष म्हणजे, केवळ फुलांच्या सजावटीवर झालेला खर्च भारतात तब्बल 12 सामान्य लग्नांचे बजेट सहज पार करू शकतो.
हे लग्न केवळ एक वैयक्तिक आनंदाचा क्षण नव्हता, तर श्रीमंती आणि भव्यतेचा परमोच्च दाखला होता जे जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरलं.