TRENDING:

Kitchen Jugaad Video : फ्रिजरखाली बांगडी टाकली आणि कमालच झाली

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : शृगांरात वापरली जाणारी बांगडी किचनमध्येही कामाला येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. बांगडीचा असा वापर ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपल्याकडे बऱ्याच बांगड्या असताच मेटलच्या बांगड्या ज्या वाकड्या असतात किंवा त्यांचा रंग गेलेला असतो. अशा बांगड्या आपण फेकून देतो किंवा त्यापासून काहीतरी बनवतो. पण याच बांगडीचा तुम्ही फ्रिजमध्ये कधी वापर करून पाहिला आहे का? फ्रिजमध्ये बांगडी वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. एका गृहिणीने हा वितित्र जुगाड दाखवला आहे.
News18
News18
advertisement

बांगडी म्हणजे महिलांचा शृंगार. महिला बांगड्या हातात घालतात. जी त्यांचं सौंदर्य आणखी खुलवते. पण महिलांच्या शृगांरात वापरली जाणारी हीच बांगडी त्यांना किचनमध्येही कामाला येऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. बांगडीचा असा वापर ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल.

बांगडीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात. पण बांगडीचा अनोखा असा वापर आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बांगडीचा असा वापर तुम्ही कधीच पाहिला नसेल.

advertisement

Kitchen Jugaad Video : चमत्कारिक पाणी, यात देवपूजेची भांडी ठेवताच चकाचक होतील, घासायची गरजच नाही

व्हिडीओत दाखवल्यानुसार महिलेने एक मेटलची बांगडी घेतली आहेत ती तोडली आहे. त्याचं एक टोक गुंडाळून घेतलं आहे. आता ही बांगडी तुम्हाला फ्रिजमध्ये टाकायची आहे. फ्रिजमध्ये फ्रिजरच्या खाली एक छोटासा छेद असतो. फ्रिजमध्ये जेव्हा आपण डिफॉरेस्ट करतो किंवा लाइट जाते तेव्हा बर्फाचं पाणी या छिद्रातून बाहेर पाणी बाहेर येतं, ते खालच्या ट्रेमध्ये पडतं आणि तिथून फ्रिजच्या मागे मोठ्या ट्रेमध्ये जातं. या छिद्रात ही बांगडी टाकायची आहे.

advertisement

या छिद्रात काही वेळ कचरा अडकतो आणि पाणी नीट जात नाही. बांगडीच्या मदतीने तुम्ही हे छिद्र स्वच्छ करू शकता. आता तुम्ही म्हणाल की यासाठी दुसरी तार वगैरे वापरू पण ही जागा अशी आहे, जिथं कोणती वस्तू सहजासहजी जाणार नाही. बांगडीही व्हिडीओत दाखवल्यानुसार तुम्हाला टाकायची आहे. तसंच बांगडी टाकण्याआधी आणि टाकल्यानंतर छिद्रातून येणाऱ्या पाण्यातील फरकही तुम्ही पाहू शकता. 

advertisement

पुणेरी तडका युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Kitchen Jugaad Video : श्रावण सुरू होण्याआधी गॅसवर ठेवा वेलची, श्रावणात होतील फायदे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18मराठी जबाबदार नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फ्रिजरखाली बांगडी टाकली आणि कमालच झाली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल