भांडी स्टिल, अॅल्युमिनिअम, तांबं, पितळ अशा वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध असतात. प्रत्येक भांड्यांसाठी आपण साबणही वेगवेगळा वापरतो. कारण स्टिलची भांडी सहज स्वच्छ होतात, अॅल्युमिनिअमच्या भांड्यासाठी काळा साबण किंवा काही लोक अंगाचा साबणही वापरतात. तर तांब्या-पितळ्यांच्या भांड्यासाठी चिंच, पितांबरी याचा वापर केला जातो. पण आम्ही तुम्हाला असं सोल्युशन दाखवणार आहोत, ज्यात तुम्ही ही सगळी भांडी धुवू शकता. त्यामुळे हे सोल्युशन म्हणजे कोणत्या जादुई पाण्यापेक्षा कमी नाही. आता हे सोल्युशन कसलं, कसं बनवायचं ते पाहुयात.
advertisement
Kitchen Jugaad Video : डिटर्जंट पावडर, साबणाशिवाय धुवा कपडे, तेही फक्त एका औषधाच्या गोळीने
एक मोठं भांडं घ्या. त्यात गरम पाणी घ्या. यात डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असेल तर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाका, सायट्रिक अॅसिड, ज्याला लिंबूसत्व असं म्हणतात, ते टाका. बस्सं फक्त या तीन वस्तू एकत्र करा. हे सोल्युशन जितकं गरम राहिल तितका रिझल्ट चांगला मिळेल, असं महिलेने सांगितलं आहे.
महिलेने या पाण्यात स्टिल आणि अॅल्युमिनिअमची भांडी बुडवून दाखवली आहेत. ती अगदी स्वच्छ झालेली, चमकताना दिसली. महिलेने सांगितल्यानुसार ही भांडी घासणीची घासण्याचीही गरज पडत नाही. फक्त जास्त तेलकट असतील तर काही वेळ या पाण्यात ठेवा, हातानेच चोळा. तेलकट नसेल तर चोळायचीही गरज नाही. पाणी फक्त भांड्यात हातांनीच फिरवत राहा.
Kitchen Jugaad Video : 1 रुपयात संपूर्ण किचन चकाचक, हा जुगाड एकदा पाहाच
महिलेनं तांब्याची भांडी या सोल्युशनमध्ये बुडवली. महिलेने सांगितलं की, तांबे-पितळ्याच्या भांड्यावर हवा तसा परिणाम मिळणार नाही. काही वेळाने ती काळपट दिसतील. पण एमर्जन्सी किंवा घाईत हा उपाय चांगला आहे. फक्त अशा भांड्यासाठी सायट्रिक अॅसिडचं प्रमाण वाढवा आणि त्यावर डाग असतील तर घासणीचा वापर करा. कारण फक्त पाण्यात बुडवून चकाकी दिसेल पण हवी तशी ही भांडी स्वच्छ होणार नाहीत. त्यामुळे फक्त घाई असेल तेव्हाच तांब्याची भांडी या सोल्युशनमध्ये धुवा, असा सल्ला महिलेने दिला आहे.
या जादुई पाण्यात भांडी धुवून झाली की ती साध्या स्वच्छ पाण्यात पुन्हा एकदा धुवून घ्या आणि कोरड्या कापडाने पुसा. म्हणजे भांड्यांवर डाग राहणार नाहीत. तुम्ही हा किचन जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.