TRENDING:

Kolhapur News: 30 हजारांची लाच घेताना महावितरणचा अधिकारी ACB च्या जाळ्यात, जल्लोषात फोडले फटाके!

Last Updated:

Kolhapur News: अपार्टमेंटमध्ये वीज जोडणीसाठी लाच घेणाऱ्या महावितरणच्या अभियंत्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी लाच घेणारा महावितरणाचा कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. प्रशांत ताराचंदजी राठी (वय 49) असे या अभियंत्याचे नाव आहे. वीज जोडणीसाठी 90 हजारांची लाच मागून 30 हजार रुपये घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या घटेनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी फटाके फोडत जल्लोष केला.
advertisement

नेमकं घडलं काय?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा एक इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याने शहरातील एका अपार्टमेंटमधील 18 फ्लॅटसाठी वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदाराने कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली. तेव्हा राठी यांनी 18 फ्लॅटसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 90 हजार रुपये लाचेची मागणी केली.

advertisement

प्रेम केलं, लग्नही केलं, संसार सुरू होणार इतक्यात... नवऱ्याने असं काही केलं की, नवरीला बसला मोठा धक्का!

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, राठी यांनी 90 हजार रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीअंती 30 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि मंगळवारी दुपारी राठी यांना 30 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी राठी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने पार पाडली.

advertisement

नागरिकांचा आनंद, राठी यांची प्रकृती खालावली

या कारवाईमुळे महावितरणमधील भ्रष्टाचाराला त्रस्त असलेल्या काही नागरिकांनी आनंद व्यक्त केला. काहींनी थेट महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात फटाके फोडून जल्लोष केला. दुसरीकडे, कारवाईमुळे राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

नागरिकांमध्ये संताप

advertisement

या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एकीकडे महावितरणसारख्या सरकारी संस्थेतील भ्रष्टाचारामुळे प्रशासन आणि कायदा यंत्रणांवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

advertisement

पुढील तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

लाच प्रकरणात राठी यांच्याविरुद्धचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे, तर फसवणूक प्रकरणात पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे सांगली आणि परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

मराठी बातम्या/Viral/
Kolhapur News: 30 हजारांची लाच घेताना महावितरणचा अधिकारी ACB च्या जाळ्यात, जल्लोषात फोडले फटाके!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल