तुम्ही परदेशात नोकरीसाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा देशांची माहिती असणे गरजेचे आहे, जिथे रविवारला सुट्टी मिळत नाही. जगात अनेक देश आहेत जिथे लोकांना रविवारसुद्धा ऑफिसला जावे लागते.यामागे धार्मिक कारणे आहेत. जाणून घेऊया अशा देशांबद्दल जिथे रविवारला सुट्टी मिळत नाही.
मॅचमध्ये पराभव झाला अन् घेतला घटस्फोट; टेनिसपटूने सुरू केले OnlyFansचे अकाऊंट
advertisement
1. इस्रायल
इस्रायलमध्ये रविवारला कामाचा दिवस मानले जाते. यामागचे कारण म्हणजे इस्रायलमधील ज्यू संस्कृती. ज्यू धर्मात शबात हा पवित्र दिवस शुक्रवारी सूर्यास्तापासून शनिवारी सूर्यास्तापर्यंत साजरा केला जातो. त्यामुळे इस्रायलमध्ये शुक्रवार आणि शनिवार हे वीकेंड मानले जातात. लोक रविवारपासून गुरुवारीपर्यंत काम करतात.
2. बांगलादेश
भारताचा शेजारी देश बांगलादेशमध्येही रविवारला सुट्टी नसते. येथे वीकेंड शुक्रवार आणि शनिवारला असतो. बांगलादेशमध्ये बहुसंख्य लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत. त्यामुळे शुक्रवारचा दिवस नमाजसाठी महत्त्वाचा मानला जातो, म्हणूनच या दिवशी सुट्टी ठेवली जाते.
IITian बाबा अभय सिंहबद्दल समोर आली कोणाला माहित नसलेली गोष्ट; वडील म्हणाले...
3. मलेशिया
मलेशियामध्ये प्रत्येक राज्याचा वीकेंड वेगळा असतो. उदाहरणार्थ, जोहोर, केदाह, केलंतन आणि टेरेंगानु या राज्यांमध्ये वीकेंड शुक्रवार आणि शनिवारला असतो. कारण इस्लाम धर्मात शुक्रवारी नमाजसाठी विशेष महत्त्व असते. मात्र राजधानी कुआलालंपूरसारख्या ठिकाणी वीकेंड शनिवार आणि रविवारला असतो. काही क्षेत्रांमध्ये मात्र रविवारीही काम करावे लागते.
4. अफगाणिस्तान
अफगाणिस्तानमध्ये कामाचा आठवडा रविवारी सुरू होतो आणि गुरुवारी संपतो. शुक्रवारी आणि शनिवारी वीकेंड असतो. इतर इस्लामिक देशांप्रमाणेच अफगाणिस्तानमध्येही शुक्रवारी लोक नमाजसाठी वेळ देतात. यासाठी सर्व कार्यालये, सरकारी कार्यालये बंद ठेवली जातात.
इंग्रजांनी लूट केली नसती तर आज भारत किती श्रीमंत असता? रक्कम वाचून डोळे गरगरतील
5. अखाती देश
बहरीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीसारख्या अखाती देशांमध्ये रविवार ते गुरुवारपर्यंत कामाचा आठवडा असतो. शुक्रवार आणि शनिवारला वीकेंड असतो. यामागील कारण म्हणजे इस्लाम धर्मात शुक्रवारी नमाजसाठी दिलेला महत्त्वाचा वेळ होय.अल्जेरिया, इजिप्त, इराक, जॉर्डन, लिबिया, ओमान, सीरिया आणि येमेनसारख्या देशांमध्येही शुक्रवारी आणि शनिवारी वीकेंड साजरा केला जातो.
जगातील अनेक देशांमध्ये रविवारला सुट्टी असते. मात्र काही देशांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांमुळे रविवारला कामाचा दिवस मानला जातो.