नवऱ्यासोबत घेतला घटस्फोट, टेनिसपटूने ठरवले एडल्ट स्टार व्हायचे; सुरू केले OnlyFansचे अकाऊंट
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Arina Rodionova: क्रीडा विश्वात सध्या एका महिला टेनिसपटूच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे घटस्फोटानंतर टेनिसपटूने एडल्ट स्टार होण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसात खेळाडूच्या घटस्फोटाबाबत बातम्या समोर येत आहेत. ज्यात भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातमीचा समावेश होता. आता भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागबद्दल देखील अशीच चर्चा सुरू झाली आहे. या सर्वात एका महिला खेळाडूच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना धक्का दिला. कारण ही बातमी फक्त घटस्फोटापुरती मर्यादीत नाही.
रशियामध्ये जन्मलेली ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अरीना रोडियोनोव्हा आणि माजी फुटबॉलपटू टाय व्हिकरी यांचा नऊ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर घटस्फोट झाला आहे. अरीना रोडियोनोव्हाने नुकतेच ही गोष्ट सोशल मीडियावरून जाहीर केली.ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अरीना रोडियोनोव्हाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिच्या सोबत टाय व्हिकरी होता. व्हिडिओत ती म्हणते, आम्हाला एक घोषणा करायची आहे. आम्ही घटस्फोट घेत आहोत. आयुष्यात कधी कधी असे घडते. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण कधी कधी ते पुरेसे नसते.
advertisement
अर्थात ही बातमी फक्त घटस्फोटापुरती मर्यादीत नाही. अरीनाने घटस्फोटनंतर टेनिस सोडण्याचा निर्णय घेतला. अरीनाने धक्का देणारा निर्णय तर त्यानंतर घेतला. टेनिस सोडून तिने एडल्ट स्टार म्हणून काम करण्याचे ठरवले आहे. अरीनाने आपल्या OnlyFans अकाऊंटचीही घोषणा केली.
advertisement
१२ जानेवारी रोजी अरीना रोडियोनोव्हा यांनी आपल्या OnlyFans अकाऊंटची घोषणा केली. त्यात ती म्हणाली होती की, ज्यांनी विचारले होते त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे, OnlyFans अकाऊंट कन्फर्म झाले आहे, तर चला सुरुवात करूया. OnlyFans या प्रौढांसाठी असलेल्या प्लॅटफॉर्मवरील आपल्या बायोमध्ये अरीनाने स्वतःला 'टेनिसपटू, पण मजेशीर' असे संबोधले आहे.गेल्या वर्षी अरीनाने सांगितले होते की, एका चाहत्याने तिला OnlyFans प्लॅटफॉर्मवर जाण्याचा सल्ला दिला होता. यावर तिने आत्तापर्यंत मिळालेली सर्वांत चांगली प्रशंसा असे म्हटले होते.
advertisement
प्रियकराला तडपवून मारणारी प्रेयसी गुगलमुळे सापडली, चित्रपट कथेला मागे टाकेल..
अरीना OnlyFansवर येणार ही चर्चा सर्वात आधी फेब्रुवारी 2022 मध्येच सुरू झाली होती. तेव्हा डारिया कसातकिनाच्या इंस्टाग्राम व्लॉगमध्ये दुबई ओपन टेनिस स्पर्धेदरम्यान WTA खेळाडूंनी गप्पा मारताना एक क्लिप शेअर करण्यात आली होती.
या व्लॉगमध्ये, अरीना रोडियोनोव्हाशी गप्पा मारताना एका खेळाडूने गंमतीने म्हटले, टेनिस सोड; OnlyFans वर जास्त पैसे कमवशील. यावर अरीनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी देखील अशीच चर्चा सुरू झाली होती.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
January 26, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
नवऱ्यासोबत घेतला घटस्फोट, टेनिसपटूने ठरवले एडल्ट स्टार व्हायचे; सुरू केले OnlyFansचे अकाऊंट