नोकरीसाठी जशी भरती निघते तशीच नागा साधू होण्यासाठीही भरती होते. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात नागा साधू म्हणून दीक्षा घेण्यासाठी अशीच उमेदवारांची भरती सुरू झाली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यासाठी हजारो तरुणांनी अर्ज केले आहेत.
कशी असते भरती प्रक्रिया?
आखाडा नोंदणी स्लिप देतं. त्यासोबत नागा साधू बनण्याची इच्छा असणाऱ्यांच्या गुप्तपणे मुलाखती घेतल्या जातात. त्यांचे फॉर्म तपासले जातात.
advertisement
आखाड्याचे थानापती, अष्टकोशल महंत उमेदवाराचं प्रोफाईल आणि ते काय करतात हे तपासतात. आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर यांना अहवाल दिला दातो. ते पंचांकडून पुन्हा तपास करून घेतात. तपास प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते.
Female Naga Sadhu : महाकुंभात मासिक पाळी आल्यावर महिला नागा साधू काय करतात?
जुना, श्री निरंजनी, श्री महानिर्वाणी, आवाहन, अटल आणि आनंद आखाड्यातील सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्यांना नागा संन्यासमध्ये दीक्षा दिली जाते. प्रत्येक आखाड्यात वेगवेगळ्या दिवशी दीक्षा प्रक्रिया पार पडते.
आता सुरू असलेल्या महाकुंभात हजारो तरुणांचे अर्ज आले आहेत. अर्जदारांची तीन स्तरांवर तपासणी करण्यात आली. अर्जाच्या तपासणीदरम्यान जुना आखाड्याचे 53 आणि निरंजनी आखाड्याचे 22 जण अपात्र आढळले.
मौनी अमावस्येला पूर्ण होणार प्रक्रिया
गंगेच्या किनारी पहिल्या बॅचचा नागा साधू बनण्याचा विधी पार पडला आहे. शनिवारी जुना आखाड्यात संन्याशांसाठी मुंडन करण्यात आलं. या संन्यासांनी स्वतःचं पिंडदान केलं. मुंडण आणि पिंडदानानंतर आता मौनी अमावस्येच्या अमृतस्नान उत्सवाच्या रात्री नागा बनण्याची पूर्ण दीक्षा घेतली जाईल. सर्व उमेदवार धर्माच्या झेंड्याखाली नग्न उभे राहतील. आचार्य मंडलेश्वर त्यांना विधी करून नागा बनण्याची दीक्षा देतील. समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणारी व्यक्ती म्हणजे सभापती त्यांना आखाड्याचे नियम आणि कायदे याबद्दल माहिती आणि शपथ देतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वांना अमृतस्नानासाठी पाठवलं जाईल.
महाकुंभात अमृत स्नान केल्याने काय होतं? महत्त्व काय?
जुना आखाड्यात सुमारे 2000 लोकांना नागा साधू होण्याची दीक्षा दिली जाईल आणि श्री निरंजनी आखाड्यात 1100 साधूंना नागा साधू बनवलं जाईल. श्री महानिर्वाणी, अटल, आनंद आणि आवाहन आखाड्यांमध्येही प्रक्रिया सुरू झाली आहे.