Mahakumbha 2025 : मकर संक्रांतीला प्रयागराजच्या महाकुंभात पहिलं शाही स्नान, अमृत स्नान केल्याने काय होतं? महत्त्व काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
महाकुंभ दरम्यान एकूण 3 अमृतस्नान होतील, त्यापैकी पहिलं अमृतस्नान मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला दुसरं अमृतस्नान 29 जानेवारी मौनी अमावस्येला आणि तिसरं 3 फेब्रुवारी वसंत पंचमीला केलं जाईल.
प्रयागराज : 13 जानेवारीपासून महाकुंभाचा उत्सव सुरू झाला आहे. 14 जानेवारी मकर संक्रांतीदिनी कुंभमेळ्यातील पहिलं शाही स्नान झालं. ज्याला अमृत स्नान असंही म्हणतात. अमृतस्नानासाठी कित्येक साधू, संत आणि भाविकांनीही गर्दी केली. हे शाही स्नान किंवा अमृत स्नान म्हणजे काय? ते का करतात? त्याचं महत्त्व काय? याबाबत सविस्तर माहिती.
महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे. पुराणानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरीने कुंभात अमृत आणलं होतं. त्यानंतर अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष झाला. हा संघर्ष थांबवण्यासाठी आणि अमृत सुरक्षित ठेवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं. त्यांनी अमृत कलश इंद्रदेवाचा मुलगा जयंत याच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिला. जयंत कुंभाचं अमृत घेऊन आकाशातून फिरला, पण राक्षसांनी त्याचा पाठलाग केला.
advertisement
या वेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले. हे थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले होते. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक ही चार प्रमुख ठिकाणं आहेत. प्रयागराजमधील गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमावर, हरिद्वारमधील गंगा नदीत, उज्जैनमधील क्षिप्रा नदीत आणि नाशिकमधील गोदावरी नदीत पडले. या ठिकाणी कुंभमेळ्याची परंपरा सुरू झाली. इथं दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. यावर्षी प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत या कुंभमेळा आहे.
advertisement
कुंभमेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो, तर अर्ध कुंभ दर 6 वर्षांनी आयोजित केला जातो. कुंभ उत्सवाचे महत्त्व केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही आहे. या जत्रेत मोठ्या संख्येने संत, ऋषी, विश्वासू भक्त आणि पर्यटक सहभागी होतात.
advertisement
महाकुंभ दरम्यान एकूण 3 अमृतस्नान होतील, त्यापैकी पहिलं अमृतस्नान मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला दुसरं अमृतस्नान 29 जानेवारी मौनी अमावस्येला आणि तिसरं 3 फेब्रुवारी वसंत पंचमीला केलं जाईल.
असं मानलं जातं की नागा साधूंना त्यांच्या धार्मिक भक्तीमुळे प्रथम स्नान करण्याची संधी दिली जाते. ते हत्ती, घोडे आणि रथांवर स्वार होऊन राजेशाही थाटात स्नान करण्यासाठी येतात. दुसऱ्या मान्यतेनुसार, प्राचीन काळी राजे आणि संत देखील ऋषी-मुनींसोबत भव्य मिरवणुकीत स्नानासाठी जात असत. या परंपरेने अमृत स्नान सुरू झालं. याशिवाय सूर्य आणि गुरू यांसारख्या ग्रहांची विशिष्ट स्थिती लक्षात घेऊन महाकुंभ आयोजित केला जातो, म्हणून याला शाही स्नान असंही म्हणतात.
advertisement
कुंभमेळ्यातील स्नानाचं महत्त्व काय?
हिंदू धर्मग्रंथांमध्ये कुंभस्नानाचे महत्त्व तपशीलवार वर्णन केलं आहे. हे स्नान म्हणजे आध्यात्मिक शुद्धी आणि मोक्षाचा मार्ग. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र कार्यक्रमात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याची सर्व पापं धुऊन जातात.
Location :
Uttar Pradesh
First Published :
January 14, 2025 9:03 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Mahakumbha 2025 : मकर संक्रांतीला प्रयागराजच्या महाकुंभात पहिलं शाही स्नान, अमृत स्नान केल्याने काय होतं? महत्त्व काय?