Mahakumbha 2025 : नागा साधू कपडे का घालत नाहीत? नग्न राहण्यामागचं कारण काय
- Published by:Priya Lad
Last Updated:
सामान्य ऋषी आणि संत सहसा पिवळे, भगवे किंवा लाल रंगाची वस्त्र घालतात. नागा साधू मात्र कपडे घालत नाहीत. त्यांच्या आयुष्याबद्दल नेहमी लोकांच्या मनात कुतूहल असतं.
कुंभमेळ्याच्या शाही स्नानात, आपल्या युद्धकलेचं प्रात्यक्षिक करत स्नानासाठी जाणारा नागा साधूंचा गट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. आदिगुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या विविध आखाड्यांमध्ये राहणारे हे साधू नग्न राहतात, अंगाला भस्म लावतात, युद्धकलेत पारंगत असतात आणि हिंदू धर्माचे अनुयायी असतात. अशा साधूंना ‘नागा साधू’ म्हणतात.
advertisement
advertisement
स्वत:ला देवाचा दूत मानणाऱ्या नागा साधूंचं आयुष्य फार कठीण असतं. नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप दीर्घ आणि कठीण मानली जाते. विविध नागा आखाड्यांमध्ये नागा भिक्षू होण्याची दीक्षा मिळते. प्रत्येक आखाड्याची स्वतःची श्रद्धा आणि परंपरा असते आणि त्यानुसार त्यांना दीक्षा दिली जाते. अनेक आखाड्यांमध्ये नागा साधूंना ‘भुट्टो’ या नावानंही संबोधलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement